सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Wednesday, February 23, 2011

गुरूविन कौन लगाये वाट.....

-महावीर सांगलीकर

आपल्या येथे गुरूंचा सुळसुळाट झाला आहे. समाजातील फार मोठा वर्ग या गुरूंच्या नादी लागला आहे. आधीच आपल्या येथे व्यक्तीपूजा नावाचा भयानक मानसिक रोग पसरलेला आहे, त्यात ती व्यक्ती गुरू असेल तर ही व्यक्तीपूजा माणसाला अधोगतीला घेवून जाते. गुरुंच्या नादी लागलेले लोक आपली बुद्धी कशी गहाण टाकतात ते पहाण्यासारखे आहे.

 महाराष्ट्रातील एक गुरू आपल्या भक्तांना पावामधून आपला बेडका (कफ) प्रसाद म्हणून देत असे. ज्या भक्तांना असा प्रसाद मिळत असे ते स्वत:ला फारच भाग्यवान मानत असत. दुसरा एक गुरू आपल्या भक्तांना प्रसाद म्हणून आपला गू (धार्मिक भाषेत विष्ठा) खायला देत असे. ती ज्यांना मिळे ते त्यांना स्वर्ग दोन बोटे उरत असे.

 गुरुने भक्ताला काठीने मारणे किंवा त्याच्या अंगावर थुंकणे हे देखील असे अंधभक्त मोठे भाग्यच मानतात. अनेक भक्त गुरुचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून पीतात. यापेक्षाही विचित्र प्रकार सगळीकडे चालॆ आहेत. अधिक खोलात जायची गरज नाही.  ज्यांना जास्तीची माहीती पाहिजेल, त्यांनी गुरूचरित्रे बघावीत!

असे गुरू आणि त्यांचे अंधभक्त हे केवळ मनोरुग्णच आहेत. पण भारतात मनाच्या रोगांना रोग मानण्याची परंपरानाही.

 हे मनोरुग्ण इतके डांबरट असतात की ज्या महापुरुषांना गुरूच नव्हते त्यांच्याही बोकांडी एखादा गुरू बसवतात. हा गुरू आपल्या 'जाती'चा असेल याचीही काळजी घेतात. तेथे पाहिजे जातीचा!

असे हे गुरू ब्रम्हचारी असतात पण सतत बायकांच्या गराड्यात असतात! या भक्त बायकांचे कित्येकदा आपल्या दादल्यापेक्षा गुरूवरच जास्त प्रेम असते!

 शहाण्यांनी गुरू करायच्या भानगडीत पडू नये. आपली बुद्धी हाच आपला गुरू मानावा. इतर गुरुंच्या नादी लागल्यास आपल्या बुद्धीची गुरूविन कौन लगाये वाट.....असे म्हणायची पाळी येवू शकते.

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week