सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, June 17, 2012

हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे

-महावीर सांगलीकर

मी हिंदू धर्माचा कट्टर विरोधक म्हणून ओळखला जातो. पण मी हिंदू धर्माचा विरोधक नसून वैदिक धर्माचा विरोधक आहे. हिंदू धर्म आणि वैदिक धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जाणकारांना सांगण्याची गरज नाही. वैदिक लोक मजबूरीमुळे किंवा धोरणीपणामुळे आपणास हिंदू म्हणवून घेतात, पण आपण हिंदू नाही आहोत हे त्यांना माहीत आहे.

माझा ब्राम्हणांना देखील इतर लोक करतात तसा सरसकट विरोध नाही आहे, तर केवळ त्या ब्राम्हणांना विरोध आहे जे हिंदू धर्माच्या आडोश्याने वैदिक धर्माचा उदो-उदो करतात, इतर धर्म व इतर धर्मियांना तुच्छ मानतात, समाजात इतर धर्म व इतर धर्मीयांबद्दल गैरसमज आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात.

त्यामुळे हिंदू धर्म, त्या धर्माच्या देव-देवता यांना सरसकट नावे ठेवणे, त्या धर्माला तुच्छ लेखणे हे चुकीचे आहे असे मी मानतो. इतकेच नाही, तर कांही लोक, जे हिंदू धर्माच्या मुळावरच उठले आहेत, ते घटनाविरोधी वागत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला त्याला पाहिजे तो धर्म पाळण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांनाही त्यांचा धर्म पाळण्याची पूर्ण मुभा आहे. घटनेचा ठेका घेतल्यासारखे वागणारे, ज्यांनी हिंदू धर्म स्वखुशीने सोडला आहे असे कांही लोक हिंदूंना हा अधिकार नसल्याचे समजत आहेत व घटनेला हरताळ फासत आहेत.

खरे पहाता या देशातील सगळ्यात जास्त लोक स्वत:ला हिंदू मानणारे आहेत. जेंव्हा तुम्ही हिंदू धर्माला, हिंदू समाजाला शिव्या घालता, तेंव्हा या देशातील सगळ्यात मोठ्या समाजाला शिव्या देवून त्यांना दुखावण्याचे काम तुम्ही करत असता. हिंदू धर्मात अनेक चुकीच्या रूढी होत्या व आजही आहेत, पण या धर्मात आणि धर्मियांत गेल्या शंभर वर्षात प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. या सुधारणा होण्यामागे राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाल गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी व इतर अनेकांनी भरघोस प्रयत्न केले आहेत. आजही हिंदू समाजातील अनेक सुधारक अशा प्रकारचे काम करत आहेत. हिंदू धर्माला व हिंदू समाजाला इतरांच्या सल्ल्याची गरज नाही, त्या समाजातील सुधारक काय करायचे ते बघून घेतील. जे हिंदू नाहीत त्यांनी हिंदू धर्माला नावे ठेवत रहाणे, तेही शिवीगाळ करत व खालच्या पातळीवर जावून, हे मूर्खपणाचे आणि संस्कारहीनतेचे लक्षण आहे.

हे हिंदू धर्म विरोधी लोक हिंदू धर्म सोडल्या नंतरही हिंदूंच्या प्राचीन अशा शिव, हनुमान, गणपती वगैरे देवतांना घाणेरड्या शब्दात नावे ठेवतांना दिसतात. खरे पहाता शिव, हनुमान, गणपती हे तीनही दैवते अवैदिकांची. बामसेफी भाषेत मूळनिवासींची. हिंदू समाजातील सगळ्यात जास्त लोक या तीन दैवतांची उपासना करणारे आहेत. त्यांच्या भावना दुखावणारे लोक स्वत:विषयी तिरस्कार निर्माण करण्यापेक्षा दुसरे कांहीही साधू शकत नाहीत. हिंदू देव-देवतांना, हिंदू धर्माला, हिंदू लोकांना सातत्याने शिव्या घालण्यापेक्षा या लोकांनी आपण स्वीकारलेल्या धर्माचे व्यवस्थित पालन कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे त्याना मानसिक शांती मिळेल व कुणाला शिव्या देण्याची गरज भासणार नाही. शिवाय त्यामुळे त्यांची लौकिक प्रगतीही होईल.

हिंदू समाजातील उपेक्षित जातींनी आपल्या उन्नतीसाठी हिंदू धर्म सोडून द्यायलाच पाहिजे असे नाही. तसेच ज्या उपेक्षित हिंदू जातींना हिन्दू धर्म नको आहे त्यांनी बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे असेही नाही. हिंदू धर्म न सोडता अनेक उपेक्षित जातींनी गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये आपली उन्नती केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच असेही अनेक समाज आहेत की ज्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माऐवजी इतर धर्म स्वीकारले व आपली उन्नती साधून घेतली.

मला असे वाटते की सर्वच धर्मियांनी आपल्या धर्माचा उपयोग राजकीय कारणासाठी, इतर धर्मियांवर कुरघोडी करण्यासाठी करणे थांबवले पाहिजे. जग नास्तिकतेच्या दिशेने चालले असताना आमचाच धर्म श्रेष्ठ असे म्हणणे चुकीचे आहे. पण ज्यांना धर्माची अजूनही गरज आहे, त्यांनी त्याचा उपयोग वैयक्तिक आणि समाज हितासाठीच केला पाहिजे, दुस-या धर्माला आणि त्याच्या अनुयायांना तुच्छ लेखण्यासाठी नव्हे.

हेही वाचा:
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी

8 comments:

  1. जगण्यासाठी माणसाला धर्माची गरजच का भासावी?

    ReplyDelete
  2. विलास खरात सर सांगलीकरांनी "हिंदू धर्माला विरोध करणे चुकीचे" हा लेख लिहून आपल्याला एक चांगलीच बातमी दिली आहे. त्यांच्या लेखातून हें सूचित होते आहे कि, हिंदू धर्म आता लयास जाण्याच्या मार्गावर आहे. बाबासाहेबांचे भाकीत आता खरे ठरत असलेले दिसून येत आहे. ते म्हणाले होते कि, तुमच्या डोळ्यासमोर हा हिंदू धर्म तुम्हाला नष्ट होताना दिसेल. ते हेही म्हणाले होते कि, "आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल! हा मी हिंदू धर्मावर उगाच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही, तो धर्मच नष्ट धर्म आहे"......माझ्या मते ब्राम्हणी वैवस्था हिंदू धर्मावर टिकून आहे. ब्राम्हण धर्म हिंदू धर्मातून काढून टाकला तर हिंदू धर्मात उरते तरी काय ? असा प्रश्न आपण सांगलीकरांना विचारू शकतो. हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी बरेच प्रयेत्न केले. बाबासाहेब आंबेडकर त्यापैकी एक होते. सांगलीकर म्हणतात गांधी पण होते. परंतु तरीही गांधी प्रणीत काँग्रेस ने बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल नाकारले..सनातन्यांनी आगरकरांची जिवंतपणी अंतयात्रा काढली..महात्मा फुले हिंदू धर्माला कंटाळले आणि त्यातून बाहेर पडून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला..राजा राम मोहन रायांवर्ती बहिष्कार टाकला..ब्राम्हणी धर्माची पैदास म्हणजेच हिंदू धर्म असे माझे स्पष्ट मत आहे..सांगलीकरांना किती भूकायचे आहे ते भूकुद्या आम्ही हिंदू धर्मावर आरोप करणारच..भदंत आनंद कौसाल्यान म्हणाले होते..कि, जे लोक स्वताला बौद्ध,मुस्लीम,ख्रिचन,सिख, म्हणवून घायला तयार नसतात ते लोक म्हणजे हिंदू होत. आणि जर हिंदू लोकांचा पायंडा असाच असेल तर आम्ही तरी या भारतात स्वताला हिंदुस्थानी म्हणवून का घायचे???????? बोला सांगलीकर..................

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदू, जैन, बौद्ध हे सर्व मुळ बहुजनांचे धर्म. परंतू या प्रत्येक धर्मात 'ब्राम्हणी' धर्माने घुसखोरी केली आहे. म्हणून यावर उपाय----

      हिंदू धर्म - ब्राम्हणी हिंदू धर्म = बहुजनांच मुळ शूद्ध हिंदू धर्म
      जैनधर्म - ब्राम्हणी जैन धर्म = बहुजनांच मुळ शूद्ध जैन धर्म
      बौध्दधर्म - ब्राम्हणी हिंदू धर्म = बहुजनांच मुळ शूद्ध बौध्द धम्म
      तसेच--
      भाजपा - RSS = बहुजनांची मुळ शूद्ध ब्राम्हणेतर पार्टी

      Delete
    2. APAN JO DHARMA SODALA TYA VAR BHUNKANYAT URJA VAYA GHALAVANYA PEKSHA JYA DIVYA DHARMAT GELAT TYACHA NAV LAUKIK VADHAVAVA.APALYA VARIL VA ATA PARYANTA CHYA BADABADI MULE APAN EKA CHANGALYA DHARMALA KALIMA FASAT AHAT.

      Delete
  3. Staying within one's own religion and pointing out the flaws and critisizing it in order to bring reforms may be justified. But once converted to some religion, one should desist from such activities. In fact, Hindu's are in general tolerent and allow the criticism which is not the case with some other religions.

    ReplyDelete
  4. प्रिय मित्रांनो,

    मला हा लेख वाचून खरच खेद होतोय कि आपण सर्वजण एकमेकांशी भांडत आहोत. जे ब्राम्हणांनी केले तेच तुम्ही पण करत आहेत. मग त्यांच्यात नि तुमच्यात फरक काय, कारण हेच आपण पूर्व पार काळापासून करत आलेलो आहोत आणि याचा फायदा परकीयांनी आक्रमण करून घेतला होता आणि या देशातून सर्व लुटून नेले, आपला देश अंधकारात बुडाला. आपल्या नाशाला आपणच कारणीभूत आहोत.
    हिंदू धर्म असा शब्द हिंदुच्या कोणत्याही ग्रंथांत उल्लेख नाही. अरब व इतर युरोपिअन लोक सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्यानां सिंधू लोक म्हणजेच हिंदू लोक असे म्हणत. मग भलेही तो कोणीही असू देत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन व इतर धर्मीय लोक असू देत, सर्व जगातले लोक आजही भारताला सिंधू, इंदू, हिंदू, म्हणजेच इंडिया Indians असे संबोधतात. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध यांनी कधीच स्वतःला हिंदू धर्माविषयी वेगळे मानले नाही, कारण हिंदू हा धर्म नाही तर ती संस्कृती आहे. आपणच सर्वजन एकमेकांपासून वेगळे समजत आलेलो आहोत. काही ब्राह्मण लोकांनी इतर कुळातील माणसांना कमी लेखले, त्यांच्यावर अत्याचार केले आणि या संस्कृतिची वाट लावली. पण सर्व ब्राह्मण सारखेच नव्हते, त्यातले काहीजन खूपच चांगले होते जसे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर असे कितीतरी अनेकजण होऊन गेले कि ज्यांनी लोकांवर चांगले संस्कार घडवले समाजाला नवी दिशा दिली. आज जगाच्या कानाकोपर्यांत शिवलिंग, गणपती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, अशा अनेक जणांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत याचा हाच अर्थ असा होतो कि आपली हि संस्कृती सर्व जगभर पसरलेली होती, पण आपल्या एकमेकांच्या द्वेषामुळे आपला देशच लयाला गेलेला आहे. तेव्हा मित्र हो आपण सर्वजन मिळून आपल्या देशाला सुसंस्कृत बनवूया, ज्याच्यामध्ये अज्ञान, अंधविश्वास, अहिंसा यांना जागा नसेल.

    ReplyDelete
  5. जग नास्तिकतेच्या दिशेने चालले असताना आमचाच धर्म श्रेष्ठ असे म्हणणे चुकीचे आहे. पण ज्यांना धर्माची अजूनही गरज आहे, त्यांनी त्याचा उपयोग वैयक्तिक आणि समाज हितासाठीच केला पाहिजे, दुस-या धर्माला आणि त्याच्या अनुयायांना तुच्छ लेखण्यासाठी नव्हे... mi ya matashi 100% sahamat aahe...

    ReplyDelete
  6. अर्थपूर्ण मांडणी .
    प्रत्येकाने पूर्वग्रह बाजुला ठेवुन तटस्थपणे विचार करायला हवा .

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week