-महावीर सांगलीकर
कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार म्हणून गौरवत आहेत. भारतीय घटनेऐवजी ती कोणी लिहिली याचेच कौतुक होत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते, त्यांनी भारतीय घटनेच्या निर्मितीत आपले योगदान दिले, या गोष्टी खऱ्याच आहेत, पण त्यांचे अंधभक्त घटना निर्मितीचे सर्व श्रेय बाबासाहेबांना देवून, त्यांना घटनेचे शिल्पकार ठरवून घटनेचा, घटना समितीचा आणि खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपमान करत आहेत.
भारतीय घटनेमध्ये कोठेही बाबासाहेबांचा उल्लेख घटनेचे शिल्पकार म्हणून केला गेलेला नाही, आणि बाबासाहेबांनीही स्वत:ला कधीच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणवून घेतले नाही.
भारतीय घटनेचे शिल्पकार कोण?
मग भारतीय घटनेचे शिल्पकार कोण? असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. भारतीय घटनेची निर्मिती हे एक टीम वर्क होते. भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे त्या समितीचे सगळेच सभासद भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात.
संविधान सभेमध्ये एकूण 299 सभासद होते. हे सभासद भारताच्या वेगवेगळ्या भागातून अप्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून आले होते. हे सभासद कोणी सोमेगोमे नव्हते, तर पंडित जवाहर लाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, टी.टी. कृष्णम्माचारी, जगजीवन राम यांच्या सारखे अनेक दिग्गज होते. हे सभासद उच्च शिक्षित होते आणि त्यातील बरेचजण तर इंग्लंड- अमेरिकेत शिकले होते.
9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या सुमारे तीन वर्षाच्या काळात या घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. 24 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या मसुद्यावर या सभासदांच्या सह्या झाल्या आणि 26 जानेवारी 1950रोजी ही घटना लागू झाली.
घटना समितीच्या एकूण 17 उपसमित्या होत्या. संपूर्ण घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तसेच ते चार उपसमित्यांचेही अध्यक्ष होते. राज्यांच्या अधिकार विषयक समिती, केंद्राच्या अधिकारांविषयी समिती आणि केंद्रीय घटना समिती या अतिशय महत्वाच्या तीन समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, तर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक व आदिवासी विषयक महत्वाच्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभ भाई पटेल हे होते.
घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या समितीत एकूण 9 सभासद होते. या मसुदा समितीचे काम घटनेचा कच्चा मसुदा तयार करणे हा होता. त्याप्रमाणे मसुदा समितीने तो तयार करून घटना समितीकडे दिला. घटना समिती मध्ये त्यातील प्रत्येक मुद्यावर चर्चा होवून तब्बल 2000 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि त्याप्रमाणे बदल करण्यात आला.
डॉक्टर बाबासाहेबांचे कांही अंधभक्त असा प्रचार करत असतात की बाबासाहेबांनी ही घटना बौद्ध धर्मानुसार लिहिली आहे. पण तसे कांही नसून भारतीय घटना ही प्रामुख्याने इंग्लंडची संसदीय लोकशाही प्रणाली आणि बऱ्याच प्रमाणात अमेरिका, फ्रांस आणि कॅनडाची घटना यांना आधार मानून तयार करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय घटना ही इंग्रजांनी 1935 साली लागू केलेल्या इंडिया अॅक्टचीच पुढची 'आवृत्ती' आहे.
कोणतेही मोठे काम हे एक टीम वर्क असते. पण भारत हा व्यक्तिपूजक लोकांचा देश असल्याने कोणत्याही कामाचे श्रेय टीमला न देता एखाद्या व्यक्तिला देण्याची येथील अनेक लोकांना खोड आहे. भारतीय घटनेच्या निर्मितीचे श्रेय एकाच व्यक्तिला द्यायचेच असेल तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना द्यावे लागेल, कारण ते पूर्ण घटना समितीचे अध्यक्ष होते.
बाबासाहेबांना घटनेचे एकमेव शिल्पकार म्हणणे हे चुकीचेच आहे. ते अनेक शिल्पकारांपैकी एक होते असे म्हणायला हरकत नाही. पण ते मुख्य शिल्पकार नव्हते हेही लक्षात ठेवायला पाहिजे.
हेही वाचा:
चिकित्सा नको असणारे लोक
मित्रानो महावीर सांगलीकरचा "आंबेडकरद्वेष" या अगोदरच जग जाहीर झालेला आहे...याच लेखाची वाट पाहत होतो पण तो एवढ्या ताबडतोब येयील असे वाटले न्हवते..... निषेध...निषेध....निषेध....
ReplyDeleteतुमचाच संग्लीकारांवर द्वेष ज्यास्त दिसतो अँड. जाधव साहेब! बाबासाहेबांवर आंधळेपणाने प्रेम करणे सोडा आणि त्यांचा प्रमाणे बुद्धीजीवी बनण्याचा प्रयत्न करा. ते बाबांना ज्यास्त आवडेल!
Deleteराम पाटील साहेब मी तुमच्या प्रतिक्रिया उत्तर दिले होते परंतु या महाशयांनी ते विसिबल केली नाही, म्हणून परत टाकत आहे पाहूयात हि तरी देतात कि नाही, तर पाटील साहेब माझा द्वेष संग्लीकरांवर नाही... आणि मी माझ्या प्रतिक्रियेमध्ये असे काही त्यांच्या बद्दल वाईट लिहलेले देखील नाही, मला असे वाटते कि, त्यांनी हे लेख मुद्दाम आंबेडकरी जनतेला चिथावण्यासाठी लिहलेला आहे, कारण शेवटी त्यांनी लिहलेले आहे कि " भारतीय घटना एका हिंदूने लिहिली हे मान्य करावेच लागेल." इथे त्यांची खालवलेली मानसिकता दिसून येते, म्हणजे इथे त्याची गरज नसतानाही त्यांनी नमूद केले आहे, माझ्या मते त्यांनी घटना कशी आणि कोणत्या कोणत्या टप्प्यात आणि कोण कोणाच्या योगदानातून निर्माण झाली हे दर्शवण्यास हवे होते, परंतु त्यांनी या लेख मध्ये फक्त बाबासाहेबांनी एकट्याने काही केले नाही एवढेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, यातूनच त्यांचा "आंबेडकरद्वेष" दिसून येतो. आणि दुसरी गोष्ठ म्हणजे " बुद्धीजीवी बनण्याचा प्रयत्न ? तो तर जोमाने चालूच आहे.... धन्यवाद
Deleteसंविधान कितीही चांगले असले पण त्याची अंमलबजावणी करणारे जर हरामखोर असतील तर ते वाईट ठरणारच .आणि हो राम पाटील तू जे राज जाधव ला सल्ला देतोस ना पहिले तू किती पाण्यात आहेत हे पहा. आरे हरामखोरानो तुमची अवस्था " विनोभा भावे च्या 'स्वरूप पहा विश्व रूप पाहू नका ' या लेखातील राजा सारखी झाली आहे. "मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली " या चालीचे तुम्ही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके भडवे आहेत. सांगलीकर वर पुण्यामध्ये राहून ब्राह्मणाची सावली पडलेली देसते हे वरील लेखातून सिद्ध होते. जय भीम बोल
ReplyDeleteबाबासाहेब हिंदू होते हे मांडण्याचा हेतू काय? ते हिंदू होते म्हणून तरी हिंदुत्ववादी घटना स्वीकारतात काय?- नाही. ते ही घटना कशी अपूर्ण आहे हे दाखविण्याच्या प्रयत्नात असतात. तसेच ही घटना तयार करण्यात बाबासाहेबांचाच मोठा वाटा आहे हे त्या मसुदा समितीतील सदस्यांनी सुद्धा मान्य केलेले आहे. ज्या काही लहान मोठ्या दुरुस्त्या सभागृहात झाल्या त्यासाठी जास्तीत जास्त समर्थने बाबासाहेबांनी दिली आहेत. हा इतिहास - ही भाषणे छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. हळूहळू गांधीजींना जसे बदनाम करीत आहात तसा हा कट दिसतो.
ReplyDeleteहे जरी खरे असले तरी एका मराठी (दलित) माणसाचे मोलाचे योगदान लाभले हे कोण मराठी (हिंदू) बोलणार नाही, कारण आपल्याला महाराष्ट्राची जात दाखवायची असते ना...
ReplyDeleteधन्यवाद सांगलीकर साहेब... Typical गिरी मधून बाहेर पडा आणि बघा विश्व खूप मोठे आहे..
तुमच्या माहितीसाठी....
Dr.Ambedkar was Chairman of the Constitution Drafting Committee and he had been the Chief Architect of Indian Constitution.
Granville Austin (an independent historian) has described the Indian Constitution drafted by Ambedkar as 'first and foremost a social document'.
मला महावीर सांगलीकर ह्यांना एक विचाराययं की एखादी सेना जेव्हा युद्धं जिकते तेव्हा ते कोणाच्या नावाने प्रसिद्ध होते सैनीकाच्या की सरदारच्या.........
ReplyDeleteअनेक पीढ्या लादलेल हिंदुत्व (हिंदुत्व स्विकारणे म्हणजे स्वत:च स्वत:ला गुलाम म्हणून घोषीत करण्या सारखे आहे).........ते बाबासाहेबांना कधीही मान्य नव्हते, त्या मुळे लादलेल्या हिंदुत्वाचा अवडंबर माजवणे सोडा........ कारण ज्या धर्मात स्वाभीमानाने जगता येत नाही, ते जगणे म्हणजे जिवंत पणी नरक यातना ठराव्यात ईतके भयानक आणी भयंकर आहे......असे असताना बाबासाहेब घटना लिहीत असताना हिंदू होते, हा खोडसळ प्रचार सांगलीकर साहेब बंद करा......भारतीय जनता जागरूक आहे....आणी स्वत:जवळ असलेल्या बुध्दीचा ते वापर करू शकतात ह्यावर कदाचीत आपला विश्वास नसावा..... म्हणूनच तुम्ही हे खोडसळ विधान करत अहात.... तुम्ही घटना निर्मिती बद्दल जे काही सांगीतले त्या बद्दल आभार..... पण हि गोष्ट जगजाहीर आहे कि घटना समिती मध्ये २९९ सभासद होते व घटना समिती च्या मसुदा समिती मध्ये ९..... पण ९ मधले किती गळाले आणी किती शिल्लक राहिले .....हि माहिती सोईस्करपणे लपवलता अहात का? .......आज पर्यंत समस्त हिंदु धर्माचे ठेकेदार जो काही लोकांमध्ये गॆरसमज पसरवत आहे त्याचे उत्तर द्या, जब्बार पटेल च्या चित्रपटा मध्ये बाबासाहेबांचे नाव ...घटना समितीच्या मसुदा समिती साठी नाव गांधी आणी नेहरू ने सुचवले असे दाखवले आहे......... हे खरे आहे का आणी जर नसेल तर तुम्ही काय खरे आहे ते लोकांसमोर आणाल का?...............बाबासाहेबांसाठी कॉंग्रेसने संसदेची दारेच नव्हे तर खिडक्या हि बंद केल्या होत्या............ बाबासाहेब जिथुन निवडणूक लढवायचे तिथे कॉंग्रेस त्यांचा पडाव त्यांच्याच समुदायातील माणसा कडून करत होते........ चांभार समाजातील काजरोळ सारख्या उमेदवारा समोर बाबासाहेबांना हार पत्करावी लागली होती..... ते कॉंग्रेसच्या कपट कारस्थानांमुळेच......... शेवटी भारता मधील बंगाल प्रदेशातील मुसलमानांनी बासाहेबांना निवडून आणले....मग तो बंगाल प्रदेश कॉंग्रेस ने जाणीव पूर्वक पाकिस्तानात ढकलण्यात आला.....कॉंग्रेस च्या ह्या खेळीमुळे बाबासाहेबांचे संसदे मध्ये जाणे अशक्य झाले.....ते ईंग्लंड ला गेले विस्टन चर्चील ह्यांना भेटले.....दुसरे महायुध्द चालू होते..... विस्टन चर्चील ह्यांनी बाबासाहेबांना सल्ला दिला कि घटना निर्मिती च्या प्रक्रिये वर बहिष्कार टाका, त्या मुळे ब्रिटीश भारता मधून निघू शकणार नाहीत.......बाबासाहेबांनी घटना निर्मितीच्य प्रक्रिये वर बहिष्कार टाकला......... तेव्हा कुठे बाबासाहेबांसाठी संसदेचे दरवाजे उघडे झाले.....(टिप: बाबासाहेबांना हिंदुत्व कधीच मान्य नव्हते....त्यांचे प्रकाशीत व अप्राकाशीत साहित्या मध्ये हे नमुद आहे......ते म्हणाले होते कि ......मि हिंदु म्हणून जरी जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही.........अशा उदात्त व्यक्तीमत्व असलेल्या माणसाला बदनाम करण्याचा मनसुबा ठेवु नका अंगाशी येईल......... हे ध्यानात ठेवा.........एवढा जर सत्य सांगण्याचा पुळका येत असेल तर भारताचा संपूर्ण सत्य ईतीहास लोकांसमोर आणण्याचे धाडस दाखवा?
ReplyDelete"चांभार समाजातील काजरोळ सारख्या उमेदवारा समोर बाबासाहेबांना हार पत्करावी लागली होती..... ते कॉंग्रेसच्या कपट कारस्थानांमुळेच."
ReplyDeleteह्याच काजरोळकर ह्यांना सावरकरांनी देखील पाठिंबा दिला होता.
राजकारण हे शक्तीवर चालते आणि शक्ती ही जनतेची असते. बाबासाहेबांनी १९३२ मध्ये ब्रिटिशांकडून स्वतंत्र मतदार संघ मिळवला. १९३५ मधेच धर्मांतराची घोषणा केली. आयुष्भर हिंदू धर्माला दूषणे दिली. बहुसंख्य हिंदू समाजाचा पाठींबा कॉंग्रेसला आहे हे स्पष्ट दिसत असतानाही कॉंग्रेसला विरोध केला. त्यानंतर ते बहुसंख्य आणि तेही धार्मिक वृत्ती असलेल्या हिंदूंच्या देशात निवडणूक लढवायला उभे राहिले. ह्याचा परिणाम दुसरा काय होणार होता?
गांधी नेहरूंच्या जागी इतर कोणतेही नेते असते तरी आंबेडकरांचा पराभव निश्चित होता. जिथे हजारो वर्षांच्या इस्लामी अत्याचारानंतरही हिंदूंचा कर्मठपणा कमी झाला नाही तिथे केवळ एकटे आंबेडकर त्यांचे परिवर्तन करू शकतील ही निव्वळ भाबडी आशा होती. आणि केवळ बाबासाहेबांना निवडून दिले म्हणून बंगालची फाळणी करण्याइतके कॉंग्रेसचे नेते मूर्ख नव्हते. तसे असते तर स्वतंत्र भारतात आंबेडकर यांना संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे काही कारणच नव्हते. १९४० साली प्रकाशित झालेल्या Pakistan or the Partition of India ह्या ग्रंथात बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिले आहे की भर समुद्रात जहाज बुडून जाऊ नये म्हणून जरुरीपेक्षा जादा असलेला माल समुद्रात फेकून द्यावा. म्हणजेच पाकिस्तान तोडण्याचा सल्ला त्यांनी देखील कॉंग्रेसला दिला होता.
तसेच आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता. मसुदा म्हणजे संविधान नव्हे. त्या मसुद्यातील प्रत्येक कलमावर संसदेत तपशीलवार चर्चा होऊन मग ते कलम संविधानात समाविष्ट केले गेले आहे. तेव्हा संविधान निर्मितीची प्रक्रिया ही संसदेने पार पाडली आहे. आणि संसद ही आंबेडकर आणि गांधी ह्या दोघांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण आंबेडकर आणि गांधी ह्या व्यक्ती आहेत आणि व्यक्तिपूजा आणि लोकशाही ह्या गोष्टी परस्परविरोधी आहेत.
लोकसभेच्या वेबसाईटवर कॉंस्टीट्युशनल डिबेट उपलब्घ आहेत.. वेळ मिळाल्यास त्या डिबेट वाचा म्हणजे संविधानातील कलम मंजुर करुण घेण्यासाठी बाबासाहेबानी किती विरोध सहन केला आणि आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर विरोध कसा निष्फळ ठरवला हे समजेल.
Deleteयाचा अर्थ बाबासाहेबांची बुद्धिमत्ता संसदेपेक्षा मोठी आहे असा घ्यायचा काय? आणि त्यांची बुद्धिमत्ता जर इतकी महान असेल तर तीच बुद्धिमत्ता वापरून त्यांनी काँग्रेसला निवडणुकांमध्ये पराभूत का केले नाही? मग काँग्रेसचे नेते हे बाबासाहेबांपेक्षा अधिक बुद्धीमान होते हे देखील मान्य करावे लागेल.
Deleteभारतीय घटना एका जन्माने हिंदू पण मनाने बौद्ध असलेल्या महामानवाने लिहिली.
ReplyDeleteमाला वाटत, हे एकच वाक्य पुरेसी प्रतिकिया देवून जात. (Thanks!) _Nitin Sutay
DeleteAnonymous ekach ahe ki doghe he kalat nahi.
ReplyDeletepahilya anonymous ne dilele mat he jast samarpak vatate.
ani doghe jar ekach astil tar ha nivval vachkancha drushtibhram karat ahe ase mhanave lage.
Mahavir Sanglikar have you read what T. T. Krishnamachchari spoke about Babasahab when Constitution submitted. Totally unnecessary article. Useless and it wont change biggest contribution of Babasahab in Constitution for an inches also.
ReplyDelete