सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label Why Brahmins Always Win. Show all posts
Showing posts with label Why Brahmins Always Win. Show all posts

Monday, February 28, 2011

...तर बहुजन ही लढाई कधीच जिंकू शकणार नाहीत!

-महावीर सांगलीकर



 कोणतीही लढाई ही संख्याबळाने जिंकली जात नसते. भीमा कोरेगावची लढाई हे याचे मोठे उदाहरण आहे. तेथे इंग्रजांच्या फक्त आठशे सैनिकांनी पेशव्यांच्या ३०००० सैनिकांचा पराभव करून पेशवाई संपवली. या आठशे सैनिकाताही इंग्रज सैनिक फक्त २५-३०च होते, तेही सगळे कमांडर.

 दुसरे उदाहरण म्हणजे लोंगोवालाच्या लढाईत १२० भारतीय सैनिकांनी ८० रणगाडे व १४० चिलखती वाहानांसह आलेल्या २००० पाकिस्तानी सैनिकांची दाणादाण उडवली.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य संख्येने कितीतरी लहान. पण त्या छोट्याशा सैन्याने लाखोच्या संख्येने असलेल्या मुघल सैन्याला हरवले.

 मुठभर इंग्रजांनी कोट्यावधी भारतीयांवर राज्य केले.

 लढाया सैनिक जिंकत नसतात, तर सेनापती जिंकत असतात.

 हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आज बहुजन लोक मनुवाद्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने लढा देत आहेत, तो पाहिला की बहुजन ही लढाई हमखास हारणार हे सरळ दिसते.

 लढाया या तुमच्याकडे किती लोक आहेत यावर जिंकल्या जात नसतात. मग ती लढाई राजकीय असो की सामाजिक. कोणतीही लढाई ही डावपेच, योजना, कुटनीती, भेदनीती, शत्रूच्या गोटात शिरकाव, हेरेगिरी अशा अनेक गोष्टींच्या जोरावर जिंकली जाते. मनुवाद्यांचे सेनापती या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज आहेत. मनुवाद्यांचे हस्तक बहुजनांच्या सगळ्याच संस्था व संघटनांमध्ये शिरले आहेत. कित्येक ठिकाणी असे हस्तक बहुजनांच्या सेनापतींच्या घरातदेखील शिरले आहेत.

याउलट बहुजनांच्या सेनापतींना यातले कांहीच जमत नाही. बहुजनांच्या संघटनांना आपली माणसे आर.एस.एस., विश्व हिंदू परीषद, सनातन संस्था, सावरकरवादी अशा संघटनांमध्ये पेरता येत नाहीत. अनेक बिनडोक बहुजन मनुवाद्यांच्या संघटनांमध्ये त्यांचे बिनपगारी नोकर म्हणून राबत असतात. त्यांना तेथेच ठेवून त्यांचा हेरेगिरीसाठी उपयोग करावा ही साधी गोष्टही बहुजनांच्या सेनापतींना कळत/जमत नाही.

ब्राम्हण लोक बहुजनांच्या जातीतील भांडणांचा फायदा घेवून त्यातील एखाद्या जातीस जवळ करतात. मग त्या दोन जातीत भांडणे लावतात. ब्राम्हणांना चांगलेच माहीत असते की कोणत्याही दोन बहुजन जातीत फारसे सख्य नसते. याउलट बहुजनांच्या नेत्यांना ब्राम्हणांमध्ये पण अनेक जाती आहेत आणि त्यांचेही एकमेकांशी पटत नाही हे माहीतच नसते. त्यामुळे त्यांच्यातील भांडणांचा फायदा त्यांच्या शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी घेता येईल हे त्यांना सुचण्याचा प्रश्नच नाही. ज्यांचा पराभव करायचा असतो त्यांच्यामध्ये आपले मित्र कोण होवू शकते, आपल्या शत्रूचा शत्रू कोण हे सगळ्यात आधी शोधायचे असते. पण बहुजनांचे सेनापती सरसकट सगळ्याच ब्राम्हणांना शत्रू मानतात. इतकेच नव्हे तर मी असे बहुजन नेते बघितले आहेत की जे कायस्थांना देखील ब्राम्हण समजतात. अनेक बहुजन नेत्यांना सगळेच देशपांडे ब्राम्हण वाटतात.

 ज्या शत्रूशी लढायचे आहे त्याच्याबद्दल बहुजनांच्या सेनापतींना कसलीच माहिती नसेल, तर ते ही लढाई कधीच जिंकू शकणार नाहीत.

 लढाया शिव्या देवून जिंकता येत नाहीत. गर्दी जमा करूनही जिंकता येत नसतात. लढाई जिंकण्यासाठी शत्रूच्या डावपेचांना त्याहूनही भारी डावपेचाने उत्तर द्यावे लागते.

महाविचार LATEST

Popular Posts This Week