-महावीर सांगलीकर
अनेक हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की गांधीजी हे भारताच्या फाळणीला जबाबदार होते. हे खरे असेल तर हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे अनेकदा आभार मानले पाहिजेत. इतकेच न्हवे तर त्यांना तेहतीस कोटी एकवा देव मानून त्यांची रोज सकाळ - संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! कसे ते पहा:
आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १२ टक्के आहे. हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा भारताची फाळणी झाली नसती तर भारत, पाकिस्तान, बांगला देश हे एकत्र असते. म्हणजे 'अखंड' भारत असता तर तेथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के असती. आज १२ टक्के लोकांचा बाऊ करणार्यांची त्यावेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.
अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टीत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रसासन, सरकारी व खाजगी नोकर्या, उद्योगधंदे, मिडीया आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणार्या जातींकडे जातो. अखंड भारतात त्यांना देवळातील घंटाच मिळाली असती. शिवाय अखंड भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार फार जोरात झाला असता व हा देश मुस्लीम देश बनण्याकडे वेगात चालाला असता.
अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते.
तेंव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत. पण तसे करण्या ऐवजी हे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय?
"अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते."
ReplyDeleteहे वरील वाक्य आपले......
हिंदुत्ववादी लोक अत्याचार करतात हे काही प्रमाणात खरे असले तरी ते सर्व हिंदुना लागू करणे अमान्य आहे.....
हिंदुत्ववादी लोक अत्याचार करतात हे काही प्रमाणात खरे असले तरी ते सर्व हिंदुना लागू करणे अमान्य आहे.....
ReplyDeletepratyaksh apratyksha pratyek hindu tyache samarthan matra nakki karto.....
हिंदू शब्दाचा अर्थ ज्यांना कळला तो कधीच स्वताला हिंदू मानणार नाही. हिंदू हे फक्त ब्राह्मण आहेत.बाकीचे जे स्वतःला हिंदू मानतात ते सगळे Guinea pig आहेत. ज्यावर कसलेही प्रयोग केलेतरी चालतो. ते त्याच कामाचे असतात. जे शिकवू तेच बोलतात आणि तसेच करतात." हिंदुधर्म हे एक भले मोठे भटी (ब्राह्मणी) गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे बिन बुडाचे पिचके गाडगे आहे तसेच आजचा धर्म हा धर्म न्हवे, प्रचलित भिक्षुकशाही म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची(ब्राह्मणाची) तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे "
ReplyDelete