सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, February 15, 2011

मराठा कोण आहेत? याविषयी आणखी थोडे | Who Are Marathas?

-महावीर सांगलीकर

नुकताच माझे मित्र संजय सोनवणी यांचा मराठा कोण आहेत? हा  लेख वाचला. 
( http://sanjaysonawani.blogspot.com/2011/02/blog-post_14.html ).  लेख खूप माहितीपूर्ण आणि संशोधनात्मक आहे. पण त्यांनी मांडलेले कांही मुद्दे चुकीचे वाटतात. त्यावर माझी मते त्यांनी दिलेल्या माहितीला पूरक माहिती मी येथे देत आहे.

 १. संजय सोनवणी यांनी व या अगोदर अनेक इतिहास संशोधकांनी महारठ्ठी या शब्दाचा संबंध मराठा व मराठी या शब्दांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे. महारठ्ठ या शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार होऊ शकतो. पण मराठा व मराठी हे शब्द महारठ्ठ पासून बनलेले नाहीत. मराठा हा शब्द मरहट्टा व मराठी हा शब्द मरहट्टी या शब्दापासून बनला आहे हे सरळ दिसून येते. मरहट्टी ही प्राचीन काळतील लोकप्रिय भाषा होती. सातवाहनकालीन साहित्य हे मरहट्टी भाषेत आहे. मरहट्ट्यांची भाषा ती मरहट्टी. मराठा व मराठी हे शब्द अगदी अलिकडेपर्यंत मर्‍हाटा व मर्‍हाटी असे लिहिले जात असत. आजची मराठी ही मरहट्टी भाषेचे अपत्य आहे, संस्कृतचे नव्हे, तसेच आजचा मराठा हा शब्द मरहट्टा या शब्दाचे अपत्य आहे, महारठ्ठ या शब्दाचे नव्हे.

याउलट महारट्ठ हा शब्द महार महाराष्ट्र या शब्दांना जवळचा आहे. प्रसिद्ध विदुषी इरावती कर्वे
यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे म्हंटले आहे. ते जास्त बरोबर वाटते.

२. राजपुतांना अनेक संशोधकांनी सिथिअन (शक) ठरवले आहे. पण सगळेच राजपूत हे सिथिअन नाहीत. जसे, राजपुतातील राठोड हे मूळचे दख्खन वरचे राष्ट्रकूट (मूळ मरहट्टी शब्द रट्टुउड) आहेत. तसेच त्यांच्यातील सोळंकी हे मूळचे दख्खन वरचेच चालुक्य आहेत. राजपूतांमध्ये गंग, होयसळ-यादव, शिलाहार अशा अनेक कुळ्या आहेत, ज्या सिथिअन वंशाच्या नाहीत.राजपुतांच्या कुळ्यांमध्ये चंद्रवंशी, सुर्यवंशी, यदुवंशी, नागवंशी असे प्रकार आहेत. त्यातील फक्त सुर्यवंशी कुळ्या याच फक्त सिथिअन असू शकतात. अनेक मराठ्यांचे मूळ कर्नाटक मध्ये आहे. पण काहीजण प्रत्येक मराठ्यांचे मूळ राजस्थानात शोधतात. ते पूर्ण चुकीचे आहे.

 ३. मुळात ९६ कुळ्या हा प्रकार अगदी अलिकडचा आहे. शिवपूर्वकाळात कुळ्यांची संख्या फारच कमी होती. त्यातील प्रमुख कुळ्या यादव, मोरे, कदम, राष्ट्रकूट(राठोड),चालुक्य, शिंदे, कलचुरे,शिलाहार, सावंत, पवार, साळवी या होत्या. शिवकालानंतर कुळ्यांची संख्या वाढत जावून ती ९६ झाली. याचे कारण म्हणजे शिवकालात मराठा या शब्दाला महत्व आले. त्यामुळे अनेक समूह स्वत: ला मराठा म्हणवून घेऊ लागले. दुसराही एक प्रकार घडला, तो म्हणजे जुन्या कुळ्याचे विभाजन एका कुळीतून दोन वा अधिक कुळ्या उदयाला आल्या.

 ४. भोसले हे मूळचे होयसळच असले पाहिजेत. ते सिसोदिया असते तर त्यांनी सिसोदिया अथवा सिसोदे हेच नाव कायम ठेवले असते. याउलट होयसळचा अपभ्रंश होवून भोसले हे आडनाव तयार झाले असणे जास्त शक्य वाटते. देवगिरीचे यादव आणि होयसळ यांचे पूर्वापार संबंध होते ही गोष्टही या दृष्टीने विचार करण्यासारखी आहे.


3 comments:

  1. Verul Yethil Bhosalyancha Shilalekhabaddal navin sanshodhan zale ahe..Tyat kuthehi Sisodiya wanshacha ullekh nahi..Dr.p.s.sadar hyani hya baddal sanshodhan kele ahe..

    u can visit his blog for contacting him...

    http://marathiindusscript.blogspot.com/

    ReplyDelete
  2. According to Mr. R.V. Russell, "the most probable meaning of Mahārāshtra would therefore seem to be ‘The country of the Mahārs.’".

    Wilson the British historian working during British rule also identified the same.

    Maharashtra word was into exists before around 6th century(as noted by Chinese traveler) the word maratha came into exists around 17th century.

    ReplyDelete
  3. we can see state names of india like Saurastraa,Gujrat,Rajstan,AndraPradesh...

    saur's rastra(nation) is saurrastra,Gujjar's land is Gujrat......
    we find majority of gujjars in raajput but the name of Rajstan is thaken from 'Rajput's place is Rajstan'

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week