-महावीर सांगलीकर
माझ्यावर कांही वाचकांनी ब्राम्हणद्वेषाचा आरोप केलाय. कांही लोकांना खरेच मी ब्राम्हणद्वेषी आहे असे वाटत असेल. पण ते खरे नाही. मी कोणत्याच समाजाचा द्वेष करत नाही, तसेच कोणत्याच समाजाविषयी मला खास असी आपुलकी नाही. मला ब्राम्हण समाजाविषयी राग असता, तर माझ्या मित्रमडळींमध्ये एकही ब्राम्हण दिसला नसता. पण प्रत्यक्षात अगदी लहानपणापासून आजपर्यंत माझे अनेक ब्राम्हण मित्र आहेत. त्यात काश्मिरी पंडीतांपासून तमिळ ब्राम्हणांपर्यंत आणि कोकणस्थ ब्राम्हणांपासून बंगाली ब्राम्हणांपर्यंत सगळ्या प्रकारचे ब्राम्हण आहेत.
माझ्या लेखांमध्ये जी टीका असते ती ब्राम्हण समाजावर नसून ब्राम्हणवादावर, ब्राम्हणी अहंगंडावर, इतरांना तुच्छ लेखण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर, त्यांच्या वर्चस्ववादावर असते. ती टीका जर कोणाला एखाद्या समाजाविरुद्धची टीका वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.
संत तुकाराम, कबीर, विवेकानंद, गाडगे महाराज. ओशो आणि इतर अनेक संतानी ब्राम्हणवादावर सडकून टीका केली आहे. महात्मा फुले, छ. शाहू महाराज, रामस्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी तर ब्राम्हणवादाच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य घालवले. या सगळ्यांचे काम आणि लिखाण यापुढे मी माझे लिखाण ’किरकोळ’ आहे. खरे म्हणजे माझ्या लिखाणाची दखल घेण्याचेही कारण नाही. तरीही ज्यांना माझे लिखाण आवडत नाही, त्यांनी वर दिलेल्या महात्म्यांचे साहित्य/ चरित्र वाचून आत्म्परीक्षण करावे.
येथे वाणगीदाखल प्रबोधनकार ठाकरे यांचे ब्राहणवादावरील कांही ’कोट्स’ देत आहे:
....भारत इतिहास संशोधक मंडळ नावाचे एक उपद्व्यापी मंडळ पुण्यास आहे. सगळ्या भारतखंडाचा इतिहास शोधून काढण्याच्या अहमहमिकेच्या काढण्या या मंडळातल्या उपद्व्यापांच्या मानेला लागल्या आहेत. पुण्याच्या चित्पावनी राष्ट्रीय रिवाजानुसार या मंडळालाही सार्वजनिकपणाचा मुलामा देण्याचे व जगातल्या सर्व अकलेचा कोठावळेपणा आपल्याकडे घेण्याची उत्पादकांनी व प्रवर्तकांनी पुष्कळच खटपट केली असल्यास त्यात फारसे नवल नाही....हे मंडळ सार्वजनिक म्हणवीत असले तरी त्यातले कार्यकारी व संशोधन म्हणजे एकजात एकरकमी एका पराचे ब्राह्मण. पुण्याची तर हीच मोठी विशेष आहे. येथील वाटेल ती संस्था किंवा चळवळ घ्या, तिचा गवगवा मात्र मोठ्या सार्वजनिकपणाचा. पण कारभारी पाहिले तर सगळे पेशवे सांप्रदायी ब्राह्मण ! उगाच नावाला एक दोन बावळट ब्राह्मणेतर असली की नाटक रंगले !....
(कोदण्डाचा टणत्कार)
हिंदवी स्वराज्याचा खून पाडण्यात दक्षिणी भिक्षुकशाहीच विशेषतः कारस्थानी ठरलेली आहे.
(कोदण्डाचा टणत्कार)
ब्राह्मण म्हणजे हिंदुधर्माचे डबोल्यावरचे भुजंग. अखिल हिंदुजनांच्या सामाजिक धार्मिक आचारविचारांचे सोल एजंट. किंवा वेदोक्ताच्या पंढरीतले बडवे.
(कोदण्डाचा टणत्कार)
निमकहरामपणाचे बीज कोकणातून आले आहे आणि ते पेशव्यांच्या अमदानीत चित्पावनांनी आपल्या भोग्योदयार्थ जेव्हा कोकणातून घाटमाथ्यावर प्रयाण केले, त्यावेळीच ते त्यांनी बरोबर आणले, हे ऐतिहासिक सिद्ध तत्व कोणी कितीही मल्लीनाथ्या आणि व्युत्पत्त्या लढविल्या तरी खोडले जाणे शक्य नाही.
(कोदण्डाचा टणत्कार)
गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडोदगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यावर थापलेले आढळतात.
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)
बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळी एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा! मग त्यांच्या घोंगावण्याने जनतेची दिशाभूल का होणार नाही? आणि हि-यांच्या भावाने गारगोट्या का विकल्या जाणार नाहीत?
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)
मी ब्राम्हण कां तर माझी आई आणि बाप हीं ब्राम्हण म्हणवितात किंवा ब्राम्हणाच्या सदराखाली मोडतात म्हणून मी ब्राम्हण जन्मसिद्ध ज्ञानी , जन्मसिद्ध श्रेष्ठ आणि जन्मसिद्ध पूज्य. मी कितीही महामूर्खं असलों, कितीहीं दुर्वर्तनी दुराचारी, भ्रष्ट , पतित , आहो फार काय पण खुद्द चांडाळालाहि लाज वाटेल अशी अनन्वित दुष्कृत्यें करण्यात निर्ढावलेला असलों तरी सुद्धा मी जन्मसिद्ध ब्राम्हण आहेया एकच आधारावर मी या लोकींचसा काय पण त्रैलोकींही वंद्यच आहे. (असा आजच्या ब्राम्हणांचा समज असतो)
(भिक्षुकशाहीचे बंड)
आत्मपरीक्षण करण्यासाठी गाईड म्हणुन आपल्याला माझे मित्र संजय सोणवणी यांची पुढील पुस्तके उपयोगी पडतील, ती आपण जरूर वाचावीत:
१. ब्राम्हण का झोडपले जातात
२. भारतीय ब्राम्हणांचे भवितव्य
आपले मित्र संजय सोनवणींनी पुरषोत्तम खेडेकरांवर केस केली आहे. या बाबत आपले मत काय?
ReplyDeleteमहावीरजी मी आपले सर्व पोस्ट वाचलेत.आपले सर्व पोस्ट जनजागृती करणारे व खरी माहिती देणारे आहेत यात वाद नाही. मात्र आपले ब्राम्हणांनी आत्मपरीक्षण करावे हा लेख वाचून धक्का बसला.आपण म्हटले आहे कि माझे अनेक ब्राम्हण मित्र आहेत आणि तुमची टीका ब्राम्हण समाजावर नसून ब्राम्हणवादावर आहे.या आपल्या भूमिकेशी मी सहमत नाही.दोन व्यक्तीमध्ये मतभेद असू शकतो.आपण तो मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ReplyDeleteडॉ.बाबासाहेबांनी जातिभेद का उच्छेद हा जो महान अप्रतिम ग्रंथ लिहिला आहे त्यात ते म्हणतात की सनातनी ब्राम्हण आणि पुरोगामी ब्राम्हण एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत.एका बाजूस कष्ट झाल्यास दुसरी बाजू तिला सावरायला पुढे येते.म्हणून ब्राम्हणवादी ब्राम्हण व समाजवादी ब्राम्हण असा फरक करणे मूर्खपणाचे आहे असा संदेश बाबासाहेब येथे देतात. ब्राम्हण हा व्यक्तिगत स्तरावर बहुजनाशी आपुलकीने मित्रत्वाने वागतो यात वाद नाही आपण त्यास चांगला म्हणतो.पण जेव्हा बहुजनांच्या सामाजिक हक्क अधिकाराचे प्रश्न येतात आणि जेव्हा सनातनी ब्राम्हण त्याचे विरोध करतात तेव्हा या चांगल्या ब्राम्हणांची प्रतिक्रिया त्याचे खरे स्वरूप उघड करते.हे तथाकथित चांगले ब्राम्हण उघडपणे बहुजनांच्या न्याय्य मागण्याचे समर्थन करीत नाहीत तसेच आपल्या सनातनी जातबांधवास उघड विरोध करतांनाही दिसत नाहीत.मग त्यांच्या चांगुलपणाला काय चाटायचे?.आमचा शत्रू ब्राम्हणवाद आहे हे खरे पण ब्राम्हण हेच ब्राम्हणवादाचे जनक आहेत हे विसरून चालणार नाही.ब्राम्हण हे बहुजनांच्या आंदोलनात (समर्थनासाठी)पूर्वीकधी नव्हते,आजही नाहीत व भविष्यातही राहणार नाहीत.ब्राम्हणवादाच्या गादीवर सुखाने बसलेले ब्राम्हण ती गादी जाळून तुमच्यासोबत खडकाड काट्याकुट्याने भरलेल्या जमिनीवर स्वत:हून बरे येतील. आणि अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे.म्हणून वरीलप्रमाणे ब्राम्हण हा ब्राम्हणवादीच असतो त्याचे मनपरिवर्तन होईल,त्याने आत्मपरीक्षण करावे अशी अपेक्षा करू नये. बहुजनामध्ये मोठ्या संख्येने ब्राम्हणवादाचे वाहक आहेत ब्राम्हणवादी आहेत.त्यांचे मात्र आम्ही आपली विरासत,मूळ धर्म, इतिहास समजावून सांगून विचारपरिवर्तन करू शकतो.
जागृत तोच ज्याला शत्रू मित्राची ओळख आहे.आपण या ब्लॉगद्वारे जागृतीचे कार्य करीत आहात.पण शत्रूविषयी (ध्येय)आपण अजून संभ्रमावस्थेत आहात असे मला वाटते.शत्रूच (आंदोलनाचे ध्येयच) जर स्पष्ट निर्धारित नसेल तर तुमचे सैन्य शस्त्र तयारी कितीही जबरदस्त असले तरी त्याचा काय उपयोग? पराभव निश्चित आहे.आमचा लढा खरोखरच ब्राम्हणवादाच्या(विषमता, जातिव्यवस्था,अन्याय,माणसामाणसात भेदाभेद) विरोधात आहे पण आपल्या या आंदोलनात ब्राम्हणांना सोबत घेण्याच्या भानगडीत पडू नये.ब्राम्हणांनी आमच्या आंदोलनात घुसपैठ करून आंदोलन संपविले हा आमचा इतिहास आहे. याबाबत सावध असावे.
Yes you are right Subhashji. This is the core target that one should not ignore, otherwise we also will be slave again.
ReplyDelete