-महावीर सांगलीकर
वि.दा. सावरकर यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली. त्यानुसार इंग्रजांनी कांही अटींवर सावरकरांची सुटका केली. (बघा: सावरकरांचा माफीनामा ) सावरकरांचे अंधभक्त या माफीचे निर्लज्ज समर्थन करतात. इतकेच नव्हे तर सावरकरांची तुलना छ्त्रपती शिवाजी महाराजांशी करत म्हणतात की महाराजांनी देखील माफी मागितली होती. .
सावरकरांची तुलना महाराजांशी करणे म्हणजे एखाद्या लबाड लांडग्याची तुलना सिंहाशी करण्यासारखे आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थिती बघून शत्रूशी तह केला, तेवढ्यापुरती माघार घेतली, पण कायमची माघार कधीही घेतली नाही. संधी मिळताच शत्रूवर पलटवार केला. याउलट सावरकरांनी दयेची भीक मागून सुटका करून घेतली आणि इंग्रजांना दिलेले वचन एखाद्या पतीव्रतेप्रमाणे शेवटर्यंत पाळले! सुटका झाल्यावर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कांहीही केले नाही. अशा सावरकरांची तुलना महाराजांशी करणे हा महाराजांचा धडधडीत अपमान आहे
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या विरोधात जागतीक पातळीवर सैन्य उभारले होते. त्यांना संपूर्ण भारतातून आणि भारताबाहेरील भारतीयांकडून मोठा पाठींबा मिळत गेला. जर्मनी, जपान आणि इतर अनेक देशांनी त्यांना मदत केली. मग का बरे सावरकरांनी त्यांच्या अनुयायांना आझाद हिंद सेनेत भरती होण्याचे आवाहन केले नाही? उलट त्यांनी भारतीय तरुणांना इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याचे आव्हान केले! हा सुभाषबाबुंच्या धाडसी कामाला शह देण्याचा प्रकार असावा अशी शंका येते.
अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांची सारी जिंदगी गांधीविरोध आणि आंबेडकर विरोध यात गेली. आपल्या लिखाणातून मुस्लिमांविषयी लोकमत कलुषित करणे, गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत रहाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेची टर उडवत रहाणे, दलितोद्धाराची नाटके करत रहाणे हीच सावरकरांची सुटकेनंतरची कामे आहेत. इंग्रजांना देश सोडायला लावायचे आहे ही गोष्ट ते विसरूनच गेले होते. किंबहुना त्यांच्या हातून/तोंडून/लेखनीतून इंग्रजांना मदत होईल अशाच गोष्टी होत होत्या.
सावरकरांनी माफी मागितली ती इंग्रजांना दिलेली एक हूल होती असा प्रचार त्यांचे आंधळे भक्त करतात. पण असा प्रचार हा फक्त खोटारडेपणा आहे.
इंग्रजांचे हित होईल असे वागणारा, इंग्रजांना दिलेले वचन शेवटपर्यंत पाळणारा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? उलट त्याला प्र. के. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्यवैरी किंवा अनेक लेखक व वक्ते म्हणतात त्याप्रमाणे माफीवीर म्हणायला पाहिजेल! पण सावरकरांचे अंधभक्त त्यांना महान ठरवण्याचा उद्योग इमाने-इतबारे करत आहेत. करोत बापडे, पण खोटा इतिहास लिहिणे अंगलट येते हे अलिकडेच सगळ्यांना बघायला मिळाले आहे हे त्यांनी ध्येनात घेतले तर त्यांच्यासाठी ते बरे होईल!
हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचा ब्राम्हणवाद
No comments:
Post a Comment