सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, May 27, 2011

इतिहास लेखन इ.स. ३०१२

-महावीर सांगलीकर


इ.स. ३०१२ मधील 'विशिष्ट' भारतीयांनी लिहिलेला इतिहास कसा असेल? 

हे  बघा कांही नमूने 

१. भारतीयांनी १६व्या ते २०व्या शतकात  इंग्लंड, अमेरिका  व  इतर अनेक देशांवर  राज्य केले होते. त्यामुळे  भारतीयांच्या इंग्रजी भाषेला इंग्लंड, अमेरिका व अनेक देशात फार महत्त्व आले. भारतीयांचा क्रिकेट हा खेळ देखील अनेक देशात लोकप्रिय झाला.

२. २१व्या शतकात अमेरिकन लोकांना संगणकाचे फारसे ज्ञान नव्हते. त्यामुळे ते लोक भारतीय संगणक तज्ञांना भरपूर पगारावर आपल्याकडे ठेवून घेत.

३. संगणक, इंटरनेट, विमाने, रणगाडे, अवकाशयाने वगैरे अनेक गोष्टींचा शोध भारतीयांनी लावला. न्यूटन, आइनस्टाइन, स्टीफन हाकिंग्ज हे  महान शास्त्रज्ञभारतीय वंशाचेच होते. न्यूटनचे  खापरपणजोबा पुण्याजवळच्या चिंचवड येथे रहात असत, तर आइनस्टाइनचे आजोबा कोथरूड येथे रहात असत.

४. दुस-या महायुद्धात भारताच्या मार्गदर्शनाखाली अमेरिका, इंग्लंड व रशियाने जर्मनीविरुद्ध आघाडी तयार केली व जर्मनीचा पराभव झाला. भारतीय शास्त्राज्ञांनी बनवलेला अणुबॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकला व जपान शरण आले. 

५. हिटलरने आत्महत्या करण्यापूर्वी गीता वाचली होती.
    
६. चंद्रावर अगोदर भारताचे चांद्रयान उतरले. त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करत अमेरिकेने
Niel Armstrong हा  पहिला मानव चंद्रावर उतरवला. हा Niel Armstrong देखील मूळ भारतीय वंशाचा  होता. Armstrong आडनावाचे अमेरिकन लोक हे मूळचे भुजबळ  आडनावाचे मराठी लोक  होते. भुजबळ = Armstrong 


७. ओसामा बिन लादेन हा कुख्यात  अतिरेकी पाकिस्तान मध्ये लपून बसला होता. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून त्याला ठार केले. त्यामुळे जगावरचे एक मोठे संकट टळले 

८. स्वातंत्र्यवीर सावरकर  यांनी जहाजावरून समुद्रात उडी टाकली, व ते अटलांटिक महासागरातून पोहत-पोहत अमेरिका गाठणार होते, आणि तेथून भारताची स्वातंत्र्य चळवळ  चालवणार होते. अमेरिकेने त्यांना गरज पडल्यास लश्करी  मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना मध्येच  अटक केल्यामुळे   हे सर्व शक्य झाले नाही. 


4 comments:

  1. aankhi yek gosht, Shri nathuram godse yani kelelya mahan karyamule lokani tyana Rashtrapita hi padvi dili........

    ReplyDelete
  2. भारतीयांनी अमेरिका व इंग्लंड वर राज्य केले ,त्यांचे वंशज आजही तेथे राहतात.

    ReplyDelete
  3. 20 vya shatakatil sagalyat unch (highest)shikhar mhanoon olakhale janare Punyatil PARVATI shikhar paschimekadil samudri waryane zijun khupach lahan zaale aahe.
    Parvati war sadashiv pethetil deshpande nawache jagatil pahile anu shatradnya (nuclear scientist)rahat hote.
    Deshpande ni tayar kelela formulyacha wapar karun tyancha shishya ALBERT EINSTEIN ne amerikela khup madat keli.

    ReplyDelete
  4. bharatatil anek lok sinh, dynosore chya jabdyat hat ghalit hoti..

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week