सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, May 7, 2011

ब्राम्हनांच्या ताब्यात देश खरेच आहे का?


 -महावीर सांगलीकर 

भारताच्या प्रशासनात आणि इतर अनेक क्षेत्रात महत्वाच्या पदांवर ब्राम्हनांचा वरचश्मा आहे असा अनेकांचा समज  आहे.

या संदर्भात नुकताच हर्षवर्धन देशपांडे यांच्या एका लेखातील आकडेवारी बघन्यासारखी आहे. त्यांनी या लेखात म्हंटले आहे की विद्यापीठांचे ५१% कुलगुरू, सुप्रीम कोर्टाचे ६५% न्यायाधीश, हायकोर्टाचे ५०% न्यायाधीश, ४१% राजदूत, ७२% आईएस ऑफिसर्स, ६१% आय.पी.एस.ऑफिसर्स  हे ब्राम्हण आहेत. तसेच रेडिओ व टी.वी.चे८३% कलाकार/कर्मचारी, एअर लाइन्स मधील ६१% कर्मचारी, सी.बी.आय/कस्टम/सेन्ट्रल एक्साइझ मधील ७२% लोक हे ब्राम्हण आहेत. ही आकडेवारी देशपांडे यांना कोठून मिळाली हे त्यांनाच ठाउक,  पण  ही आकडेवारी 'नासातील  ५०% शास्त्रद्न्य   भारतीय असतात' या सारखीच बोगस आहे. बहुधा देशपांडे बहुजन नेते जे आकडे फुगवून सांगत  असतात त्याला बली  पडलेले दिसतात.

ही आकडेवारी कशी  बोगस आहे हे  मी लगेच दाखवून देतो. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वर सध्याच्या सर्व न्यायाधीशांची नावे दिली आहेत. तेथे  एकुण २९ न्यायाधीश आहेत. मुख्य  न्यायाधीश एस. एच. कापडिया हे आहेत. ते पारशी आहेत. या २९ न्यायाधीशांपैकी फक्त ९ जन  ब्राम्हण आहेत, म्हणजे केवळ ३०% ब्राम्हण आहेत, पण प्रचारकी लोक हा आकडा फुगवून  ६५ टक्क्यावर  नेतात. हीच गोष्ट इतर सगळ्या क्षेत्रातही  घडत आहे. तुम्हाला माहीत असणा-या आय.पी.एस, आय.ए.एस. व इतर महत्वाच्या अधिका-यांच्या नावांची एक यादी बनवा, तुम्हाला त्यात ब्राम्हण अधिकारी फार तर ३०-३५%च दिसतील.

जात हीच मुख्य ओळख  असणा-या भारतीयांना, आणि त्यातील खुद्द ब्राम्हनांना देखील जातींची नीट माहिती असत नाही. त्यामुले मोठ्या  पदांवर  असलेल्या  अनेक ब्राम्हनेतरांना  ब्राम्हण समजले जाते. अनेक ब्राम्हण आणि बहुजनही बाजी प्रभु देशपांडे, स्वामी विवेकानंद, जगदीश चन्द्र बोस, मुंशी प्रेमचंद,  नेताजी सुभाष चन्द्र बोस, राजेन्द्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण,  यांना ब्राम्हण समजत असतात. पण यातील कोणीच ब्राम्हण नव्हते. बहुतेक जन बालासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, किशोरी अमोनकर यांना  ब्राम्हण समजतात. पण हे कांही ब्राम्हण नाहीत. इतकेच नव्हे तर पुण्यातील जोशी वड़ेवाले तसेच मोहन जोशी (कोँग्रेस नेते) हे जोशी असेल तरी ब्राम्हण नाहीत.

आपले मित्र संजय सोनवनी यांना देखील अनेकजन ब्राम्हण समजतात. एवढेच नव्हे तर मला देखील अनेकजन  ब्राम्हण समजत असतात.

मागे एकदा एका  ब्राम्हण विरोधी पुस्तकात लेखकाने प्रसिद्द डोक्टर व शाकाहार प्रचारक कल्याण गंगवाल यांच्यावर  ते ब्राम्हण असल्याचे गृहीत धरून टीका केली होती.

भारताच्या क्रिकेट टीम मध्ये ५०% हून जास्त ब्राम्हण असतात अशी आकडेवारी अनेकदा मी वाचली आहे. प्रत्यक्षात तेथे एक-दोनच ब्राम्हण खेलाड़ू असतात.

हुशार लोकांना ब्राम्हण समजायच्या पद्धती मुले वर देशपांडे यांनी दिलेल्या आकडेवारी सारखी खोटी आकडेवारी तयार  होत असते. या  आकडेवारीचा उपयोग  बहुजन नेत्यांना  ब्राम्हणद्वेषासाठी  तर ब्राम्हण लोकांना  आपला अहंकार जोपासन्यासाठी होत असतो.

पण हे ब्राम्हण महात्म्य आजचे नाही. भारताच्या इतिहासात अनेक महान लोकांना ते ब्राम्हण नसतांना त्यांच्यावर पुढील कालात ब्राम्हनत्व लादले गेले,  एवढेच नाही तर अनेक ब्राम्हनेतर  राजघरान्यांना ब्राम्हण घराणी ठरवले गेले. त्याबद्दल मी नंतर कधीतरी लिहीन.

4 comments:

  1. this caste is in their terminal stage of extinction, so let them njoy their age old job.
    they r most shameful part of Hindu religion.
    due them we r facing this most bad time of hindu religion.
    hindu religion divided in may big religion thans todays (budisim,jainism etc.).
    they planned to divide and rule by means of castesim.
    and still today they r implementing . . .(ur this lekh is supporting this)

    ReplyDelete
  2. I think I have made it very clear in my note that what I am quoting is a random statistics which could be wrong.

    Even if the % is 30% and not > 50% still the fact that 2-3% of the people enjoy 30% of posts is quite significant.

    Why don't you comment on the conclusions of my note. Or is it that the conclusions are not as important as inciting hatred at any cost?

    Prashantji above: Please read my note at http://www.facebook.com/#!/note.php?note_id=10150561133735461

    ReplyDelete
  3. बह्तेक हर्षवर्धन देशपांडे यांच्या लक्षात येत नाही की जी आकडेवारी ते सांगतात ती हलू हलू कमी होत चाललेली आहे कारण की 50 वर्षे पूर्वी जवळपास सर्वच क्षेत्रात ब्राह्मणाच वर्चस्व होते कारण बहुजन वर्ग शिक्षनापासून दूर होता आणि ब्रह्म्नानाच शिक्षणाचा आधिकार होता व् त्यामुले त्यांची टक्केवारी ७५% होती. पण आता परिस्तिती बदलत चालली आहे. सर्व बहुजानना शिक्षणाचा आधिकार मिळाला आहे सर आश्चर्य वाटुन घेवु नका जर पुड्चाया ५० वर्षात ब्रहमनाची टक्केवारी ५% वर आल्यास...........

    ReplyDelete
  4. खरच कधी कधी आकडे फुगवून सांगितले जातात. आमच्या समाजाच्या लोकांची नावे ब्राम्हण समाजाच्या वेबसाईटवर बेधडक टाकली जातात. कारण एकच ब्राम्हण समाज केवळ नावाच्या आधारे बेधडक हे सगळे ब्राम्हण आहेत हे सांगून मोकळे होतात. मी लिस्ट देतोय त्यातील ६०% लोक ब्राम्हण आहेत असा कायम गैरप्रचार केला जातो.

    http://www.kmsm.co.cc/2011/01/prominent-members-of-gomantak-maratha.html

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week