महावीर सांगलीकर
छ. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आपल्याला औषधालाही चित्पावन ब्राम्हण दिसत नाही. त्या काळात जे कांही ब्राम्हण होते ते आज ज्यांना देशस्थ म्हणून ओळखले जाते, ते होते. पुढे अचानक चित्पावन नावाचे नव-ब्राम्हण कोकणातून घाटावर आले आणि त्यांनी देशस्थांना बाजूला सारून सगळीकडे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी मराठेशाहीही बळकावली.
या चित्पावन ब्राम्हणांना कायस्थानी अनेकदा वठणीवर आणले, पण देशस्थांनी चित्पावनांच्या विरोधात 'कुजबूज' करण्याशिवाय इतर कांही केले नाही. उलट चित्पावन्नाबद्दल त्यांना नेहमीच प्रेम व आकर्षण वाटत आले आहे.
मी कित्येक देशस्थांना पेशवाईचे कौतुक करतांना बघितले आहे. माझा एक देशस्थ मित्र मला म्हणाला होता, 'जेंव्हा ब्राम्हणाचे डोके आणि क्षत्रियाचे मनगट एकत्र आले, तेव्हा स्वराज्य निर्माण झाले, आणि जेंव्हा डोके आणि मनगट दोन्हीही ब्राह्मणांचे होते तेंव्हा अटकेपार झेंडे गेले'. मी त्याला म्हंटले, तू पुरंदरेच्या पुस्तकातला डायलॉग बोलत आहेस वाटते?
पेशवाईच्या कौतुकामागे देशस्थांच्या मनात सुप्त अवस्थेत असलेल्या शनिवारवाड्यावरील पंगतीन्च्या आठवणी असाव्यात, तसेच चित्पावनांमुळे स्वजातीबद्दल तयार झालेला न्यूनगंडही असावा. देशस्थांना चांगलेच माहीत आहे की कट-कारस्थानांच्या बाबतीत आपण चित्पावनांचा हात धरू शकत नाही. तसेच चित्पावनांचा गोरा रंग काळ्या देशस्थांना आणखीनच 'आदरणीय' वाटत असावा. (मी गो-या किंवा काळ्या रंगाच्या विरोधात नाही. 'वर्ण 'व्यवस्था मला मान्य नाही. मला फक काळ्या लोकांना असलेला न्यूनगंड दाखवायचा आहे. )
खरे म्हणजे चित्पावन पेशवे देशस्थांना काय किमत देत होते हा एक इतिहास संशोधनाचा विषय आहे, तर आजचे चित्पावन आजच्या देशस्थांना काय किमत देतात हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे.
पळपुट्या पेशव्यांचे, माफीवीर सावरकराचे कौतुक करणारे देशस्थ लोक निधड्या छातीच्या क्रांतीवीर राजगुरूला मात्र विसरले आहेत. हा राजगुरू देशस्थ होता हे देशस्थांना माहीत आहे, पण त्याचे कौतुक केले तर चित्पावनांना आवडणार नाही हेही त्यांना माहीत आहे.
एकंदरीत देशस्थ लोक चित्पावनांचे मानसिक गुलाम आहेत असेच दिसते.
महावीरजी, आपल्याला जात पात मान्य नाही असे मला वाटत आले आहे. पण हे चित्पावन - देशस्थ काय आहे ? तुम्ही तर पोटजातीही मानता असे वाटायला लागले आहे. राजगुरू महान होते हे आपण ह्या निमित्ताने मान्य केले, हेही नसे थोडके. हि कमेंट्स प्रकाशित कराल अशी अपेक्षा आहे, अन्यथा आपण मुद्दे खोडून काढू शकत नाही म्हणून कमेंट्स न घाबरता असा आपला उद्देश आहे असा अर्थ होईल.
ReplyDelete