सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, June 2, 2011

गाढवापुढे वाचली गीता आणि ........

-महावीर सांगलीकर


गाढवापुढे  वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण  पुणेरी मराठी येणा-या  प्रत्येक माणसाला माहीत आहे. पण ही म्हण बहुजनांना गाढव ठरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. 

गीता हा विशिष्ट लोकांना जास्त आवडणारा ग्रंथ आहे, तर बहुजन समाजात गोंधळ हा एक सांस्कृतिक प्रकार आहे. बहुजनांना गीतेचे फारसे आकर्षण नाही, तर गीता आवडणा-या लोकांना गोंधळ हा गांवढळ  प्रकार वाटतो. बहुजनांना गीतेचे आकर्षण नसल्याने त्यातील तथाकथित उच्च तत्वज्ञान त्यांना समजत नाही. बहुजनांना गीता ऐकल्यावर कालचा गोंधळ बरा होता असेच वाटते. बहुजन हे विशिष्ट लोकांना  नेहमीच गाढव वाटत आले आहेत. त्यातूनच गाढवापुढे  वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण तयार झाली.

मराठी भाषेत बहुजनांचा  अपमान करणा-या अशा अनेक म्हणी व वाक्यप्रचार आहेत. अशा  म्हणी व वाक्यप्रचार विशिष्ट लोकांनीच तयार केल्या आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर एखादे पुस्तकही तयार होवू शकते.

1 comment:

  1. ज्या प्रकारे वैदिक लोक मूलनिवासी लोकांची लूट करत आहे,हे पाहून ते आपल्याला मुर्ख किंवा गाढव समजतात यात अतिशयोक्ति वाटायचे कारन नाही.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week