सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Monday, June 20, 2011

शाकाहार कांही जैनांची मक्तेदारी नव्हे

-महावीर सांगलीकर 


माझे एक मित्र विजय तरवडे यांनी मला एक प्रश्न विचारला आहे. तो मी येथे त्यांच्याच शब्दात देत आहे: 

प्रिय महावीरजी,आपण मित्र आहोत. रागावू नका. पंण मुंबईतली कोणतीही ओनरशिप इमारत घेतली तरी हेच चित्र दिसते, तिथले मध्यमवर्गीय / मांसाहारी हिंदू गायब होत आहेत. महावीरजी, खर सांगा, तुम्ही आमचा इतका राग राग का करता? आम्हाला मुस्लिम / इसाईंच्या इमारतीत बुकिंग मिळते. तुम्ही मात्र नाकारता. एरव्ही आम्ही तुमचे पिढीजात, सन्माननीय ग्राहक असतो.तरी असे का?हा प्रश्न वैयक्तिक न समजता उत्तर द्यावे, ही विनंती.

विजय  तरवडे यांने हा प्रश्न माझ्या फेस बुकवरील एका पोस्टला प्रतिक्रिया  म्हणून विचारला आहे आणि पोस्टच्या मूळ विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेले आले. असो, कांही लोक नको असलेलेले विषय बाद करण्यासाठी असा प्रकार करत असतात. तरीही मी त्यांच्या प्रश्नाचे उतार येथे स्वतंत्रपणे देत आहे.

मुंबईतील अनेक हौसिंग सोसायट्यामध्ये मध्यम वर्गीयांना आणि मांसाहारी लोकांना जागा मिळत नाहीत हे खरे आहे. पण त्याची आर्थिक आणि सामाजिक कारणे शोधून त्यांचे विश्लेषण करण्याऐवजी असे घडण्यामागे जैन समाज आहे असा शोध कांही राजकारणी आणि सनसनाटी बातम्या देण्याची खोड असणा-या मेडीयाने लावला आहे. 

ज्या सोसायटीत घराची किमत प्रचंड आहे अशा सोसायटीत मध्यवर्गीय लोकांना घर घेणे शक्य नसते. येथे कोणत्याही जाती धर्माचा संबध नाही. अशा सोसायट्यामध्ये मध्यमवर्गीयजैन लोकही घर घेऊ शकत नाहीत.

अनेक लोकांचा असा समाज आहे की जैन समाज हा श्रीमंत लोकांचा समाज आहे. पण हे पूर्ण पणे खोटे आहे. मुंबईतील अनेक जैन कुटुंबे चाळी आणि झोपड्यांमध्ये रहात आहेत. अनेक मध्यमवर्गीय जैन कुटुंबे मुंबईच्या उपनगरांमध्ये परवडेल अशा सोसायट्यामध्ये मध्ये रहातात. 

आता राहिला प्रश्न कांही सोसायट्यामध्ये मांसाहारी लोकांना जागा न मिळण्याचा. मुंबईतील कांही भागात असा प्रकार होत असतो. पण याला जैन समाजाला जबाबदार धरणे किती बरोबर आहे? मुळात अशा भागात जैनाची लोकसंख्या आणि एकूण समाजात त्यांची टक्केवारी किती? फार तर २% असणारा हा समाज एवढा प्रभावी आहे काय की त्याने त्या भागात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवावे? खरे म्हणजे या प्रकारामागे इतर शाकाहारी लोकांचा मोठा हात आहे. यात गुजराती वैष्णव बनिया  (ज्यांची संख्या जैनांच्या अनेक पटीत आहे), गुजराती ब्राम्हण, गुजरात, राजस्थान मधून येवून मुंबईत स्थाईक झालेले शाकाहारी  हिंदू लोक यांचा समावेश होतो. पण मुंबईतील अनेक लोकांना सगळेच गुजराती आणि सगळेच राजस्थानी लोक हे जैन असतात असा भ्रम झालेला असतो. इतरांचे ठीक आहे, पण ज्ञानाचा टेंभा मिरवणारे लोकही याच भ्रमात असतात याचे मला आश्चर्य वाटते. मुंबईमध्ये अस्सल मराठी जैन लोकही आहेत हे तर त्यांना माहीत असणे शक्य नाही. असो. (यांचे ग्रंथ पाहिले की तेथेही असाच  प्रकार दिसतो. अनेक ठिकाणी त्यांनी जैनांना बौद्ध तर बौद्धांना  जैन म्हंटले आहे. कांही ठिकाणी तर महावीराला गौतम बुद्ध म्हंटले आहे. यावरून हे लोक कशाचाही खोलवर अभ्यास  करत नाहीत असे दिसते). विजय तरवडे ज्यांना जैन समजतात त्यातील बहुतेक  लोक जैन नसल्याचे त्यांना दिसेल, जर त्यांनी बारकाईने पाहिले तर!

तेंव्हा मांसाहारी लोकांना जर एखाद्या सोसायटीत प्रवेश मिळत नसेल तर त्याचा दोष हिंदू शाकाहा-यांना दिला पाहिजे. शाकाहार कांही जैनांची मक्तेदारी नव्हे. तसेच मुंबईत ज्या भागात मांसाहारी लोकांना प्रवेश नाही तो भाग कांही जैनांच्या मालकीचा नव्हे.


No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week