सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, June 12, 2011

अपयशी भारतीय जनता पक्ष

-महावीर सांगलीकर


आपल्या  येथे उठसूठ  सत्ताधारी पक्षाला शिव्या घालणे हा अनेकांचा छंद असतो. अशा लोकांना विरोधी पक्षाची बाजू लावून धरण्याची खोड असते. पण जेव्हा विरोधी पक्ष आपले काम नीट करत नाहीत तेव्हाही या छांदिष्ट लोकांना विरोधी पक्षाचाच पुळका येत असतो याचे आश्चर्य वाटते.  

सध्या रामदेव बाबा आणि आण्णा हझारे यांच्या आंदोलनांच्या निमित्ताने झोपी गेलेला भा.ज.पा. हा पक्ष किंचित जागा झालेला आहे. या पक्षाचे संसदेत 115  खासदार आहेत. पण हे खासदार नेमके काय करत असतात हा संशोधनाचा विषय आहे. 

संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष वात चुकू नये  म्हणून विरोधी पक्षाने संसदेत सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायचा असतो. शिवाय संसदेबाहेरही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जन जागृती करायची असते. पण भारतीय जनता पक्ष या बाबतीत अपयशी ठरला आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे काम आण्णा-बाबांना करावे लागत आहे! 

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही नीट काम करू शकत नाही, मग त्याने सत्ताधारी बनण्याचे स्वप्न बघणे हा एक मूर्खपणाच आहे! 

पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अवस्था कम्युनिष्ट पक्षा सारखीच होणार यात संशय नाही! काँग्रेस पक्ष भा.ज.प.ची अवस्था रामदेव बाबा सारखीच करून टाकेल.



No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week