सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, January 17, 2013

बहुजनवाद्यांनी आत्मपरीक्षण करावे

-महावीर सांगलीकर 

भारत देश हा नेहमीच अल्पसंख्य समाजांकडून शाषित राहिला आहे. याला कारण अल्पसंख्य समाजाचे गुण हे तर आहेच, पण त्याचा बरोबर बहुजन समाजाचा नाकर्तेपणाही आहे.

इथे मी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवत आहे. हे निरीक्षण आहे आज देशातील सर्वोच्च महत्वाची पदे ज्यांच्या ताब्यात आहेत ते लोक कोणत्या समाजाचे आहेत त्याचे. ही पदे म्हणजे राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, लोक सभेचे सभापती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, तीनही संरक्षण दलांचे प्रमुख, सहायक दलांचे प्रमुख, विविध हेर खात्यांचे प्रमुख, विविध आयोगाचे प्रमुख. त्या निरीक्षणात असे दिसते की या देशातील सर्वोच्च पदांवर शीख, ब्राम्हण, ख्रिस्ती आणि मुस्लिम या चार समाजातील लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे.

वर उल्लेख केलेल्या अतिमहत्वाच्या पदांवर एकूण २६ व्यक्ती आहेत. त्यात ब्राम्हण ९,  शीख ५, मुस्लिम ४, ख्रिस्ती ४, दलित २, कायस्थ १ आणि जैन १ अशी विभागणी आहे. या सव्वीस लोकांत रूढ अर्थाने ज्यांना हिंदू समजले जाते त्या कुणबी, ओ.बी.सी., क्षत्रिय या गटात  मोडल्या जाणा-या  जातींचा एकही प्रतिनिधी नाही. तसेच त्यांच्यात बौद्ध धर्मियांचा एकही प्रतिनिधी नाही. अति महत्वाच्या पदांवर २ दलित व्यक्ती दिसत असल्या तरी त्या बौद्ध नसणा-या आहेत.

दुय्यम महत्वाच्या आयोगांच्या प्रमुखांचीही येथे नोंद घेतली नाही. अर्थात ती घेतली तरी निष्कर्षांमध्ये कांहीच फरक पडत नाही.

केंद्रीय मंत्री मंडळात दुय्यम महत्वाच्या जागांवर बहुजनांचे प्रतिनिधी दिसतात, पण ती पदे दुय्यम असल्याने येथे विचारात घेतली नाहीत. 

एक विशेष निरीक्षण म्हणजे सर्वोच्च पदांवर जे ९ ब्राम्हण आहेत, त्यात एकही मराठी ब्राम्हण नाही. तसेच या ९ ब्राम्हण व्यक्तींमध्ये हिंदुत्ववादाचा लवलेश देखील नाही. ब्राम्हण वाचकांनी याची नोंद घ्यावी.

सर्वोच्च पदांवर एकही बहुजन असू नये, असे का, याचा बहुजनवाद्यांनी अवश्य विचार करावा. 

पुढे सर्वोच्च पदांवर कोण-कोण  आहेत त्याची यादी दिली आहे:

भारत २०१३
राष्ट्रपती: श्री प्रणव मुखर्जी: ब्राम्हण 
उप राष्ट्रपती: हमीद अन्सारी: मुस्लिम 
सर्वोच्च न्यायाधीश: अल्तमस कबीर: मुस्लिम
लोकसभा सभापती: मीरा कुमार: दलित 

पंतप्रधान: श्री मन मोहन सिंग : शीख
सत्तारूढ पक्षाच्या नेत्या: श्रीमती सोनिया गांधी: ख्रिस्ती
संरक्षण मंत्री : ए.के. अंथोनी : ख्रिस्ती
परराष्ट्र मंत्री: सलमान खुर्शीद: मुस्लिम
गृहमंत्री: सुशील कुमार शिंदे: दलित 
अर्थमंत्री: पी. चिदम्बरम: ब्राम्हण 

सेनाप्रमुख: बिक्रम सिंग: शीख
विमानदल प्रमुख: नॉर्मन ए.के. ब्राउन : ख्रिस्ती
नौदल प्रमुख: डी.के. जोशी: ब्राम्हण 
सीमा सुरक्षा दल प्रमुख: सुभाष जोशी: ब्राम्हण
इंडो-तिबेटन सीमा बल: अजय चढा: शीख
न्याशनल सिक्युरिटी गार्डस: अरविंद रंजन: कायस्थ 

रॉ प्रमुख: आलोक जोशी: ब्राम्हण
आय.बी.प्रमुख: आसिफ इब्राहिम: मुस्लिम
सी.बी.आय. प्रमुख: उमा शंकर मिश्र: ब्राम्हण

योजना आयोग अध्यक्ष: मन मोहन सिंग: शीख
योजना आयोग उपाध्यक्ष: मोन्टेक सिंग अहलुवालिया: शीख
विधी आयोग अध्यक्ष: डी.के.जैन: जैन
मुख्य निवडणूक आयुक्त: व्ही.एस.सम्पथ: ब्राम्हण
मानवाधिकार आयोग प्रमुख: के.जी.बालकृष्णन: ख्रिस्ती 
राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख: ममता शर्मा: ब्राम्हण 
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग प्रमुख: एम.एन.राव: ब्राम्हण 

हेही वाचा: 
मी बहुजनवादापासून दूर का झालो?
भित्यापाठी ब्रम्हराक्षस 
पंजाब मधील खत्री लोक........
मी ख्रिस्ती नाही, तरीही मी हे लिहित आहे.

3 comments:

  1. खूप छान अभ्यास, निरीक्षण आणि परीक्षण.
    आत्मपरीक्षण केले असते तर हा समाज कधीच कर्मठ लोकांचा गुलाम झाला नसता. अक्षरशः हजारो वर्षापासून बहुजनवादी हे आत्मपरीक्षण करत आहेत, आणि ते अव्याहतपणे करतही राहतील. कारण त्यांचा 'समज' जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत ते आत्मपरीक्षण करूच शकत नाहीत.

    ReplyDelete
  2. एक छोटीशी चूक आपल्या निदर्शनात आणू देऊ इच्छितो - पी. चिदम्बरम हे ब्राम्हण नसून चेट्टीयार ह्या क्षत्रिय (बहुजन?) समाजातील आहेत. अर्थात ते खानदानी रइस असून त्यांना बहुजन म्हणायचे की नाही हा प्रश्न आहेच. हाय पूर्ण लिस्ट मध्ये एकच मराठी आहे (सुशीलकुमार) ही पण बाब आत्तापर्यंत लक्ष्यात आलेली नव्हती.

    ReplyDelete
  3. There is no buddhist in administration of India therefore India will remain as it is.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week