सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, February 5, 2011

दलित-आदिवासींचे धर्मांतर | Religious Conversion of Dalits and Tribals


-महावीर सांगलीकर


भारतात दलित व आदिवासींची संख्या फार मोठी आहे. खरे म्हणजे यांना रुढ अर्थाने धर्म नाही. पण कागदोपत्री त्यांच्यांवर हिंदू धर्म लादला गेला. हे सगळेजण प्राचीन काळी जैन अथवा बौद्ध होते. वैदिक धर्माचे राज्य पुन्हा आल्यावर या लोकांनी तथाकथित हिंदू धर्म स्वीकारायला नकार दिला. तेंव्हा वैदिकांनी त्यांचा छळ सुरू केला. तेंव्हा यांच्यापैकी अनेकजण जंगलात निघून गेले. तेच आजचे आदिवासी होत. याउलट जे वैदिकांच्या सरळ विरोधात गेले, त्यांना वैदिकांनी आपल्या धर्मसत्तेच्या आधारे, राजे लोकांच्या सहाय्याने बहिष्कृत केले, अतिशुद्र व अस्पृश्य ठरवले. तेच आजचे दलित होत.

 दलित व आदिवासींना आजही तथाकथित हिंदू धर्मात सगळ्यात खालचा दर्जा आहे. त्यांना अनेक अधिकार नाकारले जात आहेत. त्यामुळे त्यांचे इतर धर्मामध्ये मोठ्या संख्येने धर्मांतर चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची ऒळख करून दिली व लाखो दलितांनी बौद्ध धर्मात प्रवेश घेतला. पण सगळेच दलित कांही बौद्ध झाले नाहीत. अनेकजण ख्रिस्ती झाले, कांहीजण मुस्लीमही झाले, तर अनेकांना अजूनही हिंदू धर्म सोडवत नाही.

 तिकडे मनुवादी लोक, जे आदिवासी कधीच हिंदू नव्हते, त्यांच्यावर हिंदू धर्म लादत आहेत, तर दुसरीकडे लाखो आदीवासींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.

 अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट ही आहे की माळवा प्रांतातील दोन मोठ्या दलित जातींनी जैन धर्म स्वीकरला आहे. तसेच गुजरातमधील एक आदीवासी जमातीतील लोकांनी मोठ्या संख्येने जैन धर्मात प्रवेश घेतला आहे. याविषयी मी इथे जास्त कांही लिहीत नाही, कारण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. लवकरच मी त्या विषयावर लिहिणार आहे.

खरे म्हणजे माणसाने देव, धर्म यांच्या पलीकडे जायला पाहिजे. पण हे सगळ्यांनाच शक्य नसते. सामान्या माणसाला देवा-धर्माचा आधार लागतो. अशा परीस्थितीत दलित-आदिवासींना विषमतावादी, कर्मकांडवादी, कट्टरतावादी, वर्चस्ववादी धर्मांपासून दूर ठेवणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.


1 comment:

  1. mala kharach kalat nahi tumhi hindu dharm aani vedic dharmala aek kase mhanta...

    hindu dharm nahich aahe aani vedic dharm hach khara dharm aahe...

    vedic dharm kadhihi jatbhed karat nahi,vedic dharm murtipoojecha dhikkar karto...

    pan aapan magil hajaro varshanpasun aandhlepanane murtipooja karat aahot...

    vedic dharmat varn ha jo shabd aahe to "vrij" ya shabdapasun nirman zala..vrij cha aekach arth aahe aani to mhanje nivad athva english madeh "choice"

    me janmane brahman aahe pan mala te manya nahi..
    karan vedananusar ved n jananara brahmanacha mulga ha shudra asto..

    tar shudra vadilanchya mulane jar ved shikla tar to brahman hoto...

    mhanjech janmane konihi brahman shudra hot nahi..

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week