सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, June 30, 2012

अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद

-महावीर सांगलीकर

कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अनेक गोष्टींचा समावेश होतो. समाजातील प्रत्येक घटकाची एक संस्कृती असते आणि त्या सगळ्यांची मिळून एक कॉमन संस्कृतीही असते. बहुतेकदा समाजातील अभिजन वर्गाची संस्कृती ही त्या देशाची, त्या राज्याची संस्कृती असे मानले जाते. त्यामुळे अभिजन वर्गाची भाषा, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे गोष्टींना जास्त महत्व असते. ह्या वर्गाची संस्कृती ही दर्जेदार मानली जाते. त्यांच्या संस्कृतीपुढे इतरांची संस्कृती ही दुय्यम ठरते. संस्कृतीमध्ये भाषेला फार महत्व असते, आणि अभिजनांची भाषा ही प्रमाणभाषा मानली जाते. या प्रमाण भाषेचे नियमन अभिजन वर्गच करतो. भाषेच्या सहाय्याने हा वर्ग संपूर्ण समाजावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवतो.

आता हा अभिजन वर्ग म्हणजे नेमका कोण? अनेक बहुजनवाद्यांचा असा समज आहे की अभिजन वर्ग म्हणजे ब्राम्हण लोक. पण अभिजन वर्गाशी जातीचा अथवा धर्माचा कांही संबंध नसतो. या वर्गात वेगवेगळ्या जातींचे व धर्माचे दर्जेदार कलाकार, संगीतकार, गायक, अभिनेते, अभिनेत्र्या, चित्रकार, लेखक, विचारवंत, बुद्धीजीवी वगैरेंचा समावेश होतो. ते सगळे आर्थिक दृष्ट्या उच्च वर्गातीलच असतात असे नव्हे, तर ते मध्यमवर्गीय आणि अगदी कनिष्ट मध्यमवर्गीय देखील असतात. तेथे गुलाम अली आणि जगजीत सिंह यांना सारखाच सन्मान मिळतो. तेथे बिस्मिल्ला खान आणि . आर. रेहमान यांचेही कौतुक होते. या क्षेत्रात कसलेही आरक्षण नसते, राखीव जागा नसतात. प्रत्येकजन आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जात असतो. हे लोक स्पर्धेला घाबरत नाहीत.

महाराष्ट्रात अभिजन वर्गात ब्राह्मणांचे प्रमाण थोडे जास्त दिसत असले तरी तिथे इतर समाजातील लोकही भरपूर आहेत. पण बहुजनवादी लोक अभिजन वर्गाला ब्राम्हणवादी मानतात, आणि सगळ्याच अभिजात गोष्टीपासून फटकून वागतात. त्यांचे हे वागणे त्यांनाच नुकसानकारक ठरले आहे.

अभिजन वर्गात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरभाषिक लग्नांचे प्रमाण मोठे असते, याउलट बहुजनवादात जातीअंताच्या लढाईची भाषा करत जाती कशा संघटीत आणि मजबूत होतील हेच पाहिले जाते.

अभिजन वर्गाला जातीशी कांही देणे-घेणे नसते. पण बहुजन समाजातील लोक त्यांच्या जातीची एखादी व्यक्ती अभिजन वर्गात प्रसिद्ध असेल तर ते मोठ्या अभिमानाने त्या व्यक्तीचे कौतुक करत बसतात, पण या लोकांना त्या व्यक्तीच्या कलेशी, निर्मितीशी कसलेही देणे-घेणे नसते, कारण त्यांना त्यातले कांही कळत नसते.

बहुजनवादी लोक अभिजनांच्या संस्कृतीला ब्राम्हणी संस्कृती ठरवून तिला नावे ठेवत आपल्या संस्कृतीचे कौतुक करत बसतात, या तथाकथित ब्राम्हणी संस्कृतीला संपवण्याच्या बाता करतात, पण संस्कृतीमध्ये भर पडेल अशी कोणतीही निर्मिती करत नाहीत. साधे साहित्याचे उदाहरण घ्या. मराठी साहित्यात शेकडो विषयांवर हजारो दर्जेदार पुस्तके लिहिली जातात. ही पुस्तके मुख्यत्वे अभिजात वर्गातील लेखकांकडून लिहिली जातात. या पुस्तकांत अर्थशास्त्रापासून प्रवासवर्णनापर्यंत, खगोलशास्त्रापासून डार्विनच्या सिद्धांतापर्यंत, साहित्यशास्त्रापासून समीक्षेपर्यंत, गांधीपासून हिटलर पर्यंत अनेक विषयांची पुस्तके असतात. दुसरीकडे बहुजनवादी लोकांकडून कोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती होते हे आपण पहातोच. ते केवळ आपल्या जातीचा इतिहास, आपल्या जातीच्या एखाद्या व्यक्तीचे चरित्र आणि फारतर फुले-शाहू-आंबेडकर या विषयांभोवतीच फिरत असतात. हे लिखाणही फारसा अभ्यास न करता, पुस्तक कसे असू नये याचे मापदंड स्थापन करत लिहिलेले असतात.

खरे म्हणजे बहुजनवाद्यांकडून अभिजात गोष्टींच्या निर्मितीची अपेक्षा धरणे हेच मुळात चुकीचे आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे काय असते हेच मुळात कळत नाही, मग ते संगीत असो, साहित्य असो कि कला असो. मी अनेक असे बहुजनवादी लोक बघितले आहेत की ज्यांना चांगल्या दर्जाचे साधे विनोदही कळत नाहीत. त्यांना आवडणारे आणि कळणारे विनोद प्रामुख्याने लैंगिक अवयवांशी संबधित असावे लागतात.

अभिजन वर्गाला समाजातील उपेक्षितांबद्दल कणव असते आणि आपल्या परीने ते उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शक्य ती मदत करतात. याउलट बहुजनवादी लोक बहुजन समाजात अभिजन वर्गाविषयी द्वेष पसरवण्याचे काम करत असतात.

एक छोटेसे उदाहरण देवून मी हा लेख पूर्ण करतो. ज्यांना गांधीजी आवडत नाहीत असे बहुजनवादी लोक त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जावून, एकेरी उल्लेख करत त्यांची बदनामी करत असतात. याउलट अभिजन वर्गातील ज्या लोकांना गांधी तत्वज्ञान रुचत नाही, ते देखील गांधीजींचा आदरार्थीच उल्लेख करतात. ज्याच्याशी मतभेद असतात त्याला शत्रू मानणे हे अभिजातांच्या संस्कृतीत बसत नाही. याउलट आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणारे बहुजनवादी लोक थोडेसे कुणाशी मतभेद झाले की त्यांना आपले शत्रू घोषित करतात.

हाच फरक आहे अभिजात संस्कृतीत आणि बहुजनवादात.

हेही वाचा:
बहुजनवाद: शिक्षणबंदीचे सत्यशोधन
धर्म आणि विज्ञान
कोण म्हणतय श्रीमंत लोक क्रांती करू शकत नाहीत?
माणसाला धर्माची गरज आहे काय?

11 comments:

  1. "खरे म्हणजे बहुजनवाद्यांकडून अभिजात गोष्टींच्या निर्मितीची अपेक्षा धरणे हेच मुळात चुकीचे आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे काय असते हेच मुळात कळत नाही, मग ते संगीत असो, साहित्य असो कि कला असो. मी अनेक असे बहुजनवादी लोक बघितले आहेत की ज्यांना चांगल्या दर्जाचे साधे विनोदही कळत नाहीत. त्यांना आवडणारे आणि कळणारे विनोद प्रामुख्याने लैंगिक अवयवांशी संबधित असावे लागतात."

    इथल्या बहुजन वाद्यांना ब्राह्मणांनी सुद्धा एवढे हीन लेखले नाही,तेवढे आपण लेखत आहात.भगवान महावीरांनी सुद्धा हाच अभिजनवाद सांगितलेला दिसतोय.

    ReplyDelete
  2. सत्य हे कटू असते. भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध या दोघांचेही मुख्य शिष्य अभिजन वर्गातील होते, दोघांच्याही चरित्रावरून हे स्पष्ट होते.

    ReplyDelete
  3. महावीरजी - लिंक शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
    अकारण ब्राम्हणद्वेष हाच एक कार्यक्रम आणि विषय धरून साहित्य, कलाकृती निर्माण होत नाहीत. कलाकाराने पेश केलेली कलाकृती किंवा खेळाडूने केलेला खेळ हा जातीच्या आणि धर्माच्या पुढे असतो.
    तेंडूलकर ब्राम्हण म्हणून किंवा भीमसेन ब्राम्हण म्हणून श्रेष्ठ नाहीत तर ते अनुक्रमे खेळाडू आणि महान गायक म्हणून प्रसिद्ध झाले. आरएसएस वादी लोकांच्यात गांधीजींना नावे ठेवण्याची फ्याशन होती. सध्या ते लोण बी-ग्रेडी अथवा मूलनिवासी नालायक लोकांच्यात पसरत चालले आहे. आता गांधीजींचा दादोजी केला नाही म्हणजे मिळवले.

    - कोहम

    ReplyDelete
  4. बहुजन समाजात जन्मलेले लोकसंस्कृतीत भर पडेल अशी कोणतीही निर्मिती करू शकत नाहीत. तसेच ते चांगले लेखनही करू शकत नाही, हा तुमचा युक्तीवाद किती हास्यास्पद आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा नुकतीच संपली. ही यात्रा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. हा प्रवाह ब्राह्मणांनी qकवा तुम्ही म्हणता तशा अभिजनांनी सुरू केलेला नाही. वाढवलेलाही नाही. हा प्रवाह बहुजन जातींत जन्मलेल्या संतांनी वाढविला आहे. तुकाराम गाथेच्या तोडीचे काव्य मराठीत यानंतर कधीही निर्माण होऊ शकणार नाही. तुकाराम हे सुद्धा तुम्ही म्हणता तसे अभिजन नव्हते. बहुजन होते. चोखा मेळा त्याची पत्नी सोयराबाई हे जातीने महार होते. ‘अवघा रंग एक झाला...ङ्क हे किशोरी आमोणकरांचे गाणे तुम्हाला माहिती असेल. कारण ते तुमच्या कथित अभिजन वर्गाचे प्रतीक झाले आहे. पण हे गाणे म्हणजे चोखा मेळाची पत्नी सोयराबाईचा एक अभंग आहे, हे तुम्हाला माहिती नसेल.

    खरी संस्कृती निर्मिती बहुजनच करतात. कथित अभिजन नव्हे. अभिजन हे फक्त संस्कृती हायजॅक करीत असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. bss saheb surekh ahe aple mhanne shewati kaya tar amhi ajun magech ahot kuni lihila kuni gaila kuni wari suru keli kuni wadhawali yachich charcha karuyat ani tikde wari sukhnaiv chaluch ahe gele kahishe warshe tikde saglech ( kahi apwad ahetch) ek mekache paya dhartat jai hari mhantat ani ikde apan sushikshit ( karan aapan fb la asto na bakwas karat basto chikhul udawat ekmekachya warti ani me kiti swaccha mhanat baslo ahot jai hari

      Delete
  5. tumache lekh googly astat va te bahujanana changalya pravahat aanane ha asato ase mala tari vatate.

    tumache na sangata mala ase kalale ahe ki ,tumhala ase mhanayache ahe ki bahujanani nusate dusaryana nav thevun swata kahi changale karu shakato ki nahi he bhagayala pahije va asel himmat tar siddha karayala pahije.

    ReplyDelete
  6. I agree with Seema!

    ReplyDelete
  7. लेखाची सुरुवात चांगली केली पण नंतर नंतर लेख भरकटला आहे. "अभिजन" ची व्याख्या योग्य होती. पण बहुजनांच्या कालानिर्मितीवर गाडी जेव्हा आली तेव्हा त्यात "बहुजन" म्हणजे "अभिजात कलेची जाण नसणारे" असा मुद्दा न राहता तो बहुजन "जातीवर" घसरल्यासारखं वाटतो. उदा. "दुसरीकडे बहुजनवादी लोकांकडून कोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती होते हे आपण पहातोच. ते केवळ आपल्या जातीचा इतिहास, आपल्या जातीच्या एखाद्या व्यक्तीचे चरित्र आणि फारतर फुले-शाहू-आंबेडकर या विषयांभोवतीच फिरत असतात."

    जसा आपण मांडलेला "अभिजन वर्ग" जात, धर्मापलीकडे असतो तसा बहुजनही नसतो काय? जर असेल तर "फुले-शाहू-आंबेडकर" आणि "बहुजन वर्गाचा" संबध ह्या लेखात योग्य नाही...

    दुसरा असा कि, अभिजन वर्ग जाती धर्मापलीकडे आहे हे आपण म्हणू शकतो कारण त्यात बहुजनही (इतर जाती, वर्गातले) सामील आहेत. त्यामुळे, "दुसरीकडे बहुजनवादी लोकांकडून कोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती होते हे आपण पहातोच." हे वाक्य चुकीचे ठरत नाही काय? तुम्ही तुमच्याच विधानाशी विसंगत विधान करत आहात. अभिजन वर्गात सर्व जाती, धर्माचे लोक येतात कारण तेही "अभिजात" कलानिर्मिती करू शकतात.

    ReplyDelete
  8. As mentioned in your artical some bahujans can not even understand quality jokes, same is happening about your artical. Ppl r not able to understand the real objective of an artical of helping bahujan to uplift by showing the exact areas of improvement for them. However they have started debating on the examples and contents as usual with superficial reading.

    ReplyDelete
  9. कलेची निर्मिति ही अनेक सहस्त्रकाची साधना आहे. कलाकारात सर्वजण होते. अभिजन आणि बहुजन अशी स्युडो मांडणी आजही कलेत नाही. प्रश्न आहे तो कलेचा इतिहास लिहिण्याचा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही अभिजन बहुजन फरक दिसत नाही.मिळालेली साधनं पाहता साहित्य निर्मितीतील अभिजनांचं वर्चस्व, अभ्यासअसणं यात काहीच नवल नाही. सुरवातीची त्यांचीही निर्मिति अनगढ होती. बहुजन लिहिते व्हायला काळ जावा लागला. त्रैराशिक मांडलं तर नजीकच्या काळात ते साहित्यही उत्कृष्ट कलात्मकतेने सजलेलं असेल. शेवटी आरंभ तर कुणाचाही जे भोगलं त्या आनंद वा दुःखातूनच विद्रोह वा आक्रोशातूनच होतो. जे मांडलं आहे ते समजून घेण्याची क्षमता अभिजनात पुरेशी नाहे हेच इथं आढळून येतं. प्रयत्न बहुजनांइतकाच अभिजनानाही करावा लागेल. अन्यथा रचनात्मक निर्मिती क्षेत्रात अभिजन एकसुरीपणामुळे मागे पडतील.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week